
Loan on Aadhar Card | बँक द्वारे कर्ज घेणे हे अतिशय जोखीमेचे काम असते. कर्ज घेण्यासाठीची पात्र कागदपत्रे आपल्याजवळ असली तरच आपण बँकेद्वारे कर्ज घेऊ शकतो. तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का की, बँकेत न जाता देखील तुमच्याजवळ असणाऱ्या केवळ एका कागदपत्रामुळे तुम्हाला कर्ज मिळू शकते. ते कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डचा वापर करून तुम्हाला कर्ज प्राप्त करता येऊ शकते.
आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही 50,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. 2020 साली महामारीच्या काळात केंद्र सरकारकडून व्यावसायिक लोकांसाठी एक योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला पंतप्रधान स्वनिधी योजना असं म्हणतात. या योजनेचे मूळ कारण म्हणजे महामारीनंतर व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय पुन्हा नव्याने उभारण्यास मदत व्हावी म्हणून. या योजनेअंतर्गत व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारच्या हमी शिवाय कर्ज देण्यात येते.
आधार कार्डद्वारे मिळतो योजनेचा लाभ :
महामारीनंतर व्यावसायिकांना नव्याने स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी या योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे कर्ज देण्यात येते. सर्वप्रथम कर्ज देताना 10,000 रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज तुम्हाला कोणत्याही प्रकारची हमी न देता मिळते त्याचबरोबर हे गर्द आधार कार्डशी जोडलेले असते.
या कर्जाची खासियत म्हणजे व्यवसायिकाने वेळेवर पहिले कर्जाची परतफेड केली तर, त्याला पुढच्या वेळी 20,000 रुपयांचे कर्ज मिळते. असेच सातत्याने कर्जाची परतफेड केली तर, 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवता येते. तुम्ही जे कर्ज घेतले आहे त्याची परतफेड 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये करावी लागते.
अशा पद्धतीने करा कर्जासाठी अर्ज :
योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे कर्ज हवे असल्यास अर्ज करण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल क्रमांकाची लिंक असणे गरजेचे आहे. समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर, तुमचे अर्ज आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला ई-केवायसी देखील करावी लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.