
Most Expensive Fish | तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे मोठे मोठे मासे ताव मारत खाल्ले असतील. सुरमई, पापलेट, बांगडा, कुपा, वाम, रावस अशा अनेक प्रकारच्या मास्यांची नावे तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी टूना नावाच्या मास्याबद्दल ऐकले आहे का? टूना नावाचा हा मासा अतिशय अवाढव्य आहे. या मास्याची खास गोष्ट ऐकून तुम्ही दंग व्हाल. हा मासा तब्बल करोडच्या भावांमध्ये विकला जातो. असं नेमकं काय आहे या मास्यामध्ये जाणून घेऊया.
टूना नावाचा हा मासा बाजारामध्ये 2 करोड या भावाने विक्री केला जातं आहे. या मास्याची किंमत जेवढी जास्त आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त तो चवीला देखिल उत्कृष्ट आहे. हा मासा त्याच्या चवीमुळे अतिशय लोकप्रिय ठरला आहे. हा मासा तुम्हाला फक्त आणि फक्त जपानमध्ये पाहायला आणि चाखायला मिळेल. या मास्याचे वजन तब्बल 200 ते 250 किलो एवढे आहे.
या मास्याची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे हा माझा चाळीस वर्षांहून अधिक काळ जिवंत राहू शकतो. जपानची राजधानी टोक्योमध्ये 2023 च्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये 212 किलो एवढं वजन असणाऱ्या टूना मास्याची बोली लावली गेली. ही बोली बघता बघता 2 लाख 74 हजारांवर गेली आणि शेवटी हा मासा 2 करोड 23 लाख 42 हजारांवर येऊन विकला गेला.
सर्वात मोठा असणारा हा टुना नावाचा मासा तुम्हाला प्रशांत महासागरामध्ये मिळेल. त्याचबरोबर या मास्याला ब्लूफिन टुना या नावाने देखील ओळखलं जातं. हा मासा सतत समुद्राच्या खोलवर तळाशी बसलेला असतो. क्वचितच हा मासा समुद्राच्या वर पाहायला मिळतो. त्याचबरोबर टुना मास्याला इतर ठिकाणी ‘ येलोफीन टूना ‘ असे देखील म्हटले जाते.
या मास्याची किंमत आणि चव तर कळाली. त्याचबरोबर या मास्यामधून तुम्हाला अनेक प्रकारचे पोषक तत्वे देखील मिळतात. या मास्यामध्ये तुम्हाला विटामिन डी, विटामिन बी 12, विटामिन ए, प्रोटीन, सेलेनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अमेगा – 3 फॅटी ऍसिड यांसारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. या मास्याच्या सेवनाने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून लांब राहू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.