5 May 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

Multibagger Stock | अपार इंडस्ट्रीज शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, शेअरची किंमत आणि कामगिरी पाहून खरेदीचा विचार करा

Multibagger Stock

Multibagger Stock | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. म्हणून हा स्टॉक आता तज्ज्ञांच्या रडारवर आला आहे. अपार इंडस्ट्रीज ही कंपनी अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टर बनवण्याचे काम करते.

50,000 रुपये गुंतवणुकीवर करोडो रुपये परतावा

या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 50,000 रुपये गुंतवणुकीवर करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 240 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 3,149.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची कामगिरी

शुक्रवार 17 जून 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 3132.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 13 जून 2003 रोजी अपार इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स 15.56 रुपयेवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 3,149.15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.

याचा अर्थ या कंपनीच्या स्टॉकने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 20029 टक्क्यांनी वाढवले आहे. आणि अवघ्या 50,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर लोकांना 1 कोटी रुपयेपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने फक्त दीर्घ कालावधीत नाही, तर अल्प मुदतीत ही लोकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणूकीवर परतावा

अपार इंडस्ट्री कंपनीच्या शेअरची 52-आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 3296.40 रुपये होती. तर या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 832.85 रुपये होती. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 215.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना गुंतवणूकदारांना 339.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 82.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Apar industries for investment on 19 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x