14 December 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

My EPF Money | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, बोनस वाढीसह EPF वर मिळणार जास्तीचा इन्शुरन्स कव्हर, अधिक जाणून घ्या

My EPF Money

My EPF Money | ईपीएफ खातेधारकांसाठी अत्यंत खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना अनेक सुविधा देत आहे. ईपीएफओमध्ये गुंतवणूक करून जिथे गुंतवणूकदारांना पेन्शनचा लाभ मिळू शकतो तसेच मोठे फंड ही तयार होऊ शकतात. याशिवाय ईपीएफओ सदस्यांना ईपीएफ खातेधारकांना बोनस वाढीसह जास्तीच इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे.

निर्णय :
सीएनबीसी आवाज या वृत्त प्लॅटफॉर्मला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार श्रम मंत्रालयाने एडिशनल बेनिफिट कायमचे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय श्रम मंत्रालयाने एम्पलोयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत घेतलेला आहे.

ॲडिशनल नियम :

ॲडिशनल केलेला नियम ईपीएफओमध्ये असणाऱ्या प्रत्येक खातेधारकाला लागू होणार. श्रम मंत्रालयाने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय कायमचा सुरू ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर जीवन इन्शुरन्स पॉलिसी वाढवून 7 लाख रुपये केली आहे.

बोनसमध्ये कमालीची वाढ :

मिळणारी रक्कम 12 महिन्यांच्या बेसिक पगारावर ठरणार आहे. त्याचबरोबर विम्याची रक्कम जेमतेम 2.5 लाखांची असणार आहे. दरम्यान बोनसची रक्कम 1,50,000 हून वाढवून 1.75 लाख रुपये एवढी केली आहे. हा अतिरिक्त फायदा पहिले सरकारने 3 वर्षांकरिता लागू केला होता. हा नवीन नियम सरकारने कायमस्वरूपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीचा ईपीएफओचा नवा नियम
ईपीएफओने अंशत: पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. मनसुख मांडविया म्हणाले की, ईपीएफ खात्यातून अंशत: पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ईपीएफओ सदस्य ईपीएफ खात्यातून 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.

Latest Marathi News | My EPF Money 20 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x