 
						My EPF Money | पगारातून ईपीएफ कापला जाणाऱ्या नोकरदारांसाठी फायद्याची अपडेट आहे. प्रत्येक नोकरदार व्यक्तीचे ईपीएफ खाते असते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम दरमहा जमा केली जाते, तेवढीच रक्कम कंपनीकडून आपल्या वतीने जमा केली जाते.
ईपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. अनेकदा असे दिसून येते की, अनेक कर्मचारी तीन ते चार वर्षांनंतरच नोकरी बदलतात. यावेळी ते आपल्या ईपीएफ खात्यातून संपूर्ण पैसेही काढतात.
ईपीएफओच्या नियमांनुसार त्यांनी तसे केल्यास त्यांचे ईपीएफ सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. कर्मचाऱ्यांनी ईपीएफ नव्या खात्यात ट्रान्सफर केल्यास त्यांना दुहेरी लाभ मिळू शकतो. नोकरी बदलताना आपल्याकडे कोणते पर्याय आहेत ते येथे आहे.
काय आहेत पर्याय
नोकरी बदलताना पीएफमधून संपूर्ण पैसे काढण्याऐवजी तुम्ही पीएफ फंड ट्रान्सफर करू शकता. यामुळे तुम्हाला जमा झालेल्या फंडावर चक्रवाढ व्याज मिळत राहील. तसेच ईपीएफचे सदस्यत्वही कायम राहणार आहे. इतकेच नाही तर 10 वर्षांच्या सलग सेवेनंतर तुम्ही ईपीएफओचे पेन्शन मिळविण्यास पात्र आहात.
बेसिक सॅलरी प्रमाणे – 12,94,000 रुपये ते 1 कोटी रुपये मिळतील
उदाहरणार्थ, जर तुमचा बेसिक पगार 15,000 रुपये असेल आणि तुमच्या आणि तुमच्या कंपनीच्या वतीने दरमहा ईपीएफ खात्यात जवळपास 3600 रुपये जमा केले जातात. ईपीएफ खात्यावर सध्या 8.35 टक्के व्याज मिळत आहे. त्यानुसार 15 वर्षांनंतर तुम्हाला जवळपास 12 लाख 94 हजार रुपये मिळू शकतात.
तर 1 कोटी 29 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल
याशिवाय 30 वर्षांनंतर तुम्हाला 55 लाख 46 हजार आणि 40 वर्षांनंतर 1 कोटी 29 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते. जेव्हा तुमचे पीएफ खाते नियमित असेल, ही रक्कम दरमहा जमा होईल तेव्हाच तुम्हाला ही रक्कम मिळते.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		