14 December 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • NHPC Share Price
  • कराराचे तपशील
  • शेअरची कामगिरी
NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनएचपीसी लिमिटेड कंपनीने (NSE: NHPC) आंध्र प्रदेश राज्यात पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प आणि इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन कंपनीसोबत करार केला आहे. (एनएचपीसी लिमिटेड अंश)

या कंपनीने सांगितले की पहिल्या टप्प्यात 2 पंप्ड स्टोरेज प्रकल्प, यगंती या ठिकाणी 1000 MW क्षमतेचे आणि राजुपालम या ठिकाणी 800MW क्षमतेचे प्रकल्प संयुक्तपणे उभारण्यात येणार आहेत. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 94.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कराराचे तपशील :
या करारावर एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि MD आरके चौधरी आणि AP Genco कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक KVN चक्रधर बाबू यांनी स्वाक्षरी केली होती. यावेळी आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू देखील उपस्थित होते. आंध्र प्रदेशात पावर स्टोरेज प्रकल्प विकसित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. भारत सरकारने 2030 पर्यंत 500 GW अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्याचे आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन क्षमता साध्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

शेअरची कामगिरी :
मागील आठवड्यात शुक्रवारी एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह क्लोज आले होते. मागील एका वर्षात एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 78 टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जुलै 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 118.45 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ऑक्टोबर 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 48.48 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x