 
						Property Knowledge | एक सामान्य व्यक्ती त्याच्या आयुष्यात दोन किंवा तीन वेळा मालमत्तेची खरेदी आणि विक्री करतो. कारण की सामान्य व्यक्तीकडे जास्तीत जास्त एक किंवा दोन प्रॉपर्टी असताना पाहायला मिळते. अशातच प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या काही अवहेलनामुळे तुम्ही स्वतःचे मोठे नुकसान देखील करून बसू शकता. आज आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी संबंधित काही टिप्स शेअर करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीचं प्रॉपर नॉलेज येईल आणि तुम्ही कोणत्याही फ्रॉड प्रकरणांमध्ये फसणार नाही.
1) एजंटची मदत घ्या :
कोणतीही प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करायची झाली तर, सतरा गोष्टी कराव्या लागतात. अगदी प्रॉपर्टीच्या करारापासून ते प्रॉपर्टी विकेपर्यंत सर्व गोष्टींची माहिती आणि तरतूद आखावी लागते. अशावेळी तुम्ही स्वतःहून प्रॉपर्टी विक्री करण्याचा विचार करू शकता किंवा एजंटच्या मदतीने प्रॉपर्टीची विक्री करू शकता.
2) सेलर प्रॉपर्टीवर दुसऱ्याचा हक्क आहे की नाही तपासा :
प्रॉपर्टी विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे काही गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये विक्री करणारी प्रॉपर्टी सेलरकडे कधीपासून आहे या गोष्टीची तपासणी करणे गरजेचे आहे. ही तपासणी करण्यासाठी तुम्ही सबरजिस्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन घेऊ शकता. एवढंच नाही तर संबंधित प्रॉपर्टीवर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने दावा तर केला नाही ना याची देखील शाश्वती असली पाहिजे.
3) विक्री केल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीबद्दल ही गोष्ट जाणून घ्या :
विक्री केल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीवर सेलरची ओनरशिप असणे गरजेचे आहे. कारण की सध्याच्या काळात रियल इस्टेटच्या अनेक ऑनलाईन वेबसाईट आहेत. या वेबसाईटवर प्रॉपर्टी खरेदी केली जाऊ शकते किंवा विकलीही जाऊ शकते. अशावेळी संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचणे आणखीन सोपे होते.
4) फेल व्हॅल्यू निश्चित करा :
प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तींनी प्रॉपर्टी पिरियड आणि सेल व्हॅल्यू निश्चित करून घेणे गरजेचे आहे. सेल लेण्या-देण्याच्या प्रक्रियेत टेलरला प्रॉपर्टीचे राइट्स ट्रान्सफर करावे लागतात. यासाठी एक सेल डिड बनवली जाते आणि या सेल डिड ला रजिस्टर देखील केले जाते. सेल डिडच केलं जाणारं रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते.
5) 15 दिवसांनी सर्टिफिकेट प्राप्त करा :
प्रॉपर्टी खरेदी करताना सबरजिस्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन किमान 15 दिवसांआधी जाऊन एक सर्टिफिकेट प्राप्त केले पाहिजे. हे सर्टिफिकेट प्रॉपर्टीवर कोणतेही लोन अप्लाय झालेले नसल्याचे असते. हे सर्टिफिकेट सेलरकडे असणे देखील फायद्याचे मानले जाते.
6) ही गोष्ट देखील लक्षात ठेवा :
प्रॉपर्टीची लेण्या-देण्याची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभाग, सिटी लँड सिलिंग ट्रिब्यूशनल किंवा नगरपालिकेकडून परवानगी घ्यावी लागेल. त्याचबरोबर प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्ही एक लिमिट निश्चित केली पाहिजे. त्याचबरोबर प्रॉपर्टी विकण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा हाउसिंग सोसायटीकडून परमिशन घेणे गरजेचे आहे.
7) एग्रीमेंटमध्ये या गोष्टीचा उल्लेख करा :
समजत प्रॉपर्टीवर एखादं कर्ज आहे आणि प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला असं वाटेल की, विक्रेता प्रॉपर्टी वरील सर्व कर्ज, टॅक्स, लोन या सर्व गोष्टींसाठी पेमेंट करेल. त्यामुळे समोरच्याचा गैरसमज होण्याआधीच एग्रीमेंटवर सर्व गोष्टी व्यवस्थितपणे नमूद करा.
8) दोन्ही पक्षांची सहमती गरजेची :
मालमत्तेसाठीच एग्रीमेंट बनवताना दोन्ही पक्षांची लिखित सहमती असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही हे देखील मेन्शन करू शकता की, केलं जाणार पेमेंट मंथली बेसवर दिले जाणार की एक साथ दिले जाणार. या सर्व गोष्टींची पूर्तता आधीच करून घेणे फायद्याचे ठरेल.
9) प्रॉपर्टीवर लँड एग्रीमेंट आहे की नाही चेक करा :
सेल डिडमध्ये पैशांचे आदान-प्रदान, स्टॅम्प ड्युटी, पेमेंटचे उपाय, ओनरशिप ट्रान्सफर, मध्यस्थी व्यक्ती या सर्व गोष्टींची माहिती करून घ्या. त्याचबरोबर प्रॉपर्टीवर एखादे लँड एग्रीमेंट आहे की नाही हे देखील तपासा.
10) महत्त्वाची गोष्ट :
प्रॉपर्टी संबंधित एग्रीमेंट खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये केले जाते. यामधून असे सांगितले जाते की, प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत पूर्ण पेमेंट करत नाही तोपर्यंत ती मालमत्ता सेलरच्या निगराणी खाली असते.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		