
Property Knowledge | सध्याच्या घडीला भारतामध्ये मालमत्तेशी निगडित घर, प्रॉपर्टी आणि जमिनींचे भाव शिगेला लागले आहेत. रियल इस्टेटचे सर्वच रेट हाय रेट असून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्थैर्य स्थापत्यसाठी स्वतःची मालकी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत आहे. परंतु या रियल स्टेटसच्या दुनियेत तुमच्या हाती योग्य आणि कायदेशीर प्रॉपर्टी लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायदेशीररित्या प्रॉपर्टी खरेदी केल्याने तुम्हाला भविष्यातील येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या 5 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
प्रॉपर्टीची निगडित एक गोष्ट ओरम डेव्हलपमेंटचे सीएमडी प्रदीप मिश्र यांच्या म्हणण्यानुसार रेडी टू मूव प्रॉपर्टी खरेदी करणे फायद्याचे मानले जाते. परंतु प्रॉपर्टी खरेदी करताना काही लोक शिल्लक चुका करून बसतात. याच चुकांमुळे त्यांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.
1) प्रॉपर्टीचे टायटल क्लियर आहे की नाही हे तपासा :
तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा जमीन खरेदी करताना त्या मालमत्तेच मेन टाइटल क्लियर आहे की नाही या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला प्रॉपर्टीच्या टायटलची पूर्णपणे जाचपडताळणी करायची असेल तर, तुम्ही रेवेन्यू ऑफिसमध्ये जाऊन सर्व काही चेक करून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही ज्या मालकाकडून प्रॉपर्टी खरेदी करत आहात ती प्रॉपर्टी नक्की त्या मालकाचीच आहे की नाही हे तपासता येईल. त्याचबरोबर तुम्हाला प्रॉपर्टीशी निगडित माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही बँकेत देखील जाऊन माहिती करून घेऊ शकता.
2) आजूबाजूच्या सुविधा :
प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही आजूबाजूच्या सुविधांची देखील काळजी घेतली पाहिजे. तुम्ही अगदी स्टेशनच्या बाजूला किंवा जवळ घर घेतलं नसेल तरीसुद्धा, स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर घर घेतले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी राहणार आहात तिथे आजूबाजूला किराणा, रोजच्या वापरातील सामान, बाजारहाट, भाजीपाला, मेडिकल, हॉस्पिटल, शाळा या सर्व गोष्टी हाकेच्या अंतरावर असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी पैसे मोजावे लागतील.
3) इमारतीच्या गुणवत्तेचा मूल्यांकन :
तुम्ही ज्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करत आहात त्या इमारतीच्या गुणवत्तेचा मूल्यांकन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनियरची मदत घेऊ शकता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्याही इमारतीची एक्सपायरी डेट 70 ते 80 वर्षांपर्यंत असते. परंतु इमारतीचा स्ट्रक्चर बघून तुम्हाला ती इमारत चांगली आहे की नाही हे आधीच तपासून घेतलं पाहिजे नंतर.
4) रेजिडेंट वेल्फेअर असोसिएशन :
तुम्ही ज्या ठिकाणी घर खरेदी करत आहात तिथे रेजिडेंट वेल्फेअर असोसिएशन ही सुरक्षा आहे की नाही या गोष्टीची तपासणी करणे अत्यंत गरजेचे. यामध्ये पाणी, प्लंबिंग, विज यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंचा आणि सामानांचा समावेश होतो.
5) महत्त्वाची सुरक्षा :
तुम्ही ज्या ठिकाणी घर खरेदी करण्याचा विचार करत आहात तिथे सीसीटीव्ही, पोलीस स्टेशन, चौकीदार, हॉस्पिटल त्याचबरोबर मुख्य सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की एकदा घर खरेदी केल्यानंतर तुम्हाला दुसरं खरं खरेदी करण्यापर्यंत बराच कालावधी लागू शकतो.