30 May 2023 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

SBI Mutual Fund | पैसा हवाय की रडत राहायचंय? उत्तम भविष्यासाठी या फंडांत SIP करा, 5000 ची गुंतवणूक आणि 14 लाख परतावा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund| ऑक्टोबर महिन्यात महागाईचे आकडे जाहीर झाले होते, त्यात महागाई पासून दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जगावर आर्थिक मंदीचे संकट अजूनही घोंगावत आहे. ब्रिटनमध्ये चलनवाढीचा दर 11 टक्क्यांच्या वर गेला आहे. गुंतवणूक तज्ञांनी मत व्यक्त केले आहे की, जगात शैक्षणिक महागाई दुहेरी आकड्याने वाढत आहे. विशेषत: उच्च शिक्षण शुल्कात वाढ होण्याचा वेग सर्वात जास्त दिसून आला आहे. ज्या प्रकारे रुपया गडगडत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा खर्चही वाढत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी आतापासूनच गुंतवणुक करायला सुरुवात करा.

शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा :
गुंतवणूक तज्ञ नेहमी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देतात. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाचे वय जितके लहान असेल तितकी गुंतवणुकीची सुरुवात लवकर होईल. जसजसे तुमच्या मुलाचे वय वाढत जाईल तसे तुमच्या गुंतवणुकीचे प्रमाणही वाढत जाईल. मुलाच्या वयानुसार गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शैक्षणिक महागाई दर, दरमहा होणारी बचत, रुपयाचे अवमूल्यन, तरलतेची जोखीम यासारख्या महत्त्वाच्या बाबीचा विचार नक्की करावा.

शैक्षणिक महागाई दुहेरी अंकात :
ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर महागाईच्या आकडेवारीनुसार शैक्षणिक महागाई दर दुहेरी अंकावर पोहचला आहे. अशा स्थितीत योग्य ठिकाणी गुंतवणूक करा जेणेकरून तुम्हाला परतावाही दुहेरी अंकात मिळेल. दुहेरी अंकात परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडापेक्षा चांगली दुसरी योजना असूच शकत नाही. जर तुम्ही पुढील 10 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, सरासरी 12-14 टक्के परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला किमान 80 टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात करावी लागेल. बचत मधील 20 टक्के रक्कम कर्ज रोख्यामध्ये गुंतवू शकता.

म्युचुअल फंडचा फंडा :
गुंतवणुक बाजारातील तज्ञांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी काही म्युचुअल फंड योजना निवडल्या आहेत. तुमचा पोर्टफोलिओ तयार करताना हे वेगवेगळे फंड त्यात समाविष्ट करा. कोणत्याही एका निधीवर आंधळेपणाने पैसे लावू नका. खालील म्युचुअल फंड लिस्ट सेव्ह करा :

1) डीएसपी इक्विटी फंड
2) एचडीएफसी फ्लेक्सिकॅप फंड
3) कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
4) एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड
5) एसबीआय कॉन्ट्रा फंड
6) डीएसपी वर्ल्ड मायनिंग फंड
7) फ्रँकलिन इंड. फंड.
8) फीडर-फ्रँक यूएस ओप.
9) ABSL मनी मॅनेजर फंड
10) UTI मनी मार्केट फंड

5000 SIP गुंतवणुकीवर 14 लाख परतावा :
उदाहरणाने हिशोब समजून घेऊ. SBI फोकस्ड इक्विटी फंडामध्ये तीन वर्षांत सरासरी वार्षिक 17 टक्के परतावा मिळतो. या योजनेत पाच वर्षांत गुंतवणूकदारांनी सरासरी वार्षिक 14.61 टक्के परतावा कमावला आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड योजनेने सरासरी 15.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेची निव्वळ मालमत्ता मूल्य 257 रुपये आहे. तुम्ही योजनेत फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंड योजनेचा आकार 28407 कोटी रुपये आहे. जर तुम्ही आजपासून या म्युचुअल फंडात 5000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली तर 10 वर्षानंतर तुम्हाला एकूण 14.45 लाख रुपये परतावा मिळेल. या दरम्यान तुमची गुंतवणुकीची एकूण रक्कम 6 लाख रुपये असेल, आणि त्यावर तुम्ही 8.45 लाख रुपये परतावा कमवू शकता. या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास तुम्हाला 14.45 लाख निव्वळ परतावा मिळेल. भविष्यात तुम्ही ही रक्कम तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Mutual Fund focused on Equity for investment and earning huge returns on 18 November 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x