26 January 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता
x

Property Knowledge | बांधकामाधिन घराची बुकिंग करावी की, रेडी टू मूव्ह घर खरेदी करावे, कोणता पर्याय फायद्याचा ठरेल जाणून घ्या

Property Knowledge

Property Knowledge | आयुष्यात प्रत्येक व्यक्तीवर घर खरेदी करण्याची वेळ येतेच. अशातच अनेक व्यक्ती घर खरेदी करताना बांधकाम करताना घराची बुकिंग करून ठेवतात तर काहीजण डायरेक्ट रेडी टू मूव्ह घर खरेदी करतात.

दरम्यान काही प्रॉपर्टी तज्ञांच्या मते व्यक्तींनी रेडी टू मूव्ह घर खरेदी करण्यापेक्षा बांधकामाधीन घर खरेदी करण्याकडे वळाले पाहिजे. असं तज्ञांचे मत आहे. सध्याच्या घडीला बांधकामाधीन खरेदी करून अनेक व्यक्ती अधिक लाभ मिळवत आहेत. परंतु अशा स्थितीत आपल्याला वेळेवर घराचा ताबा मिळण्यास अडचणी निर्माण होतात सोबतच प्रकल्प रखडण्याचे देखील प्रकार पाहायला मिळतात. एवढा असून सुद्धा लोक बांधकामाधीन घर घेणे पसंत करतात.

रेरामुळे फसवणूक होत नाही :
RERA म्हणजेचं रियल स्टेटस रेग्युलेटरी ऑथॉरिटी याची एन्ट्री झाल्याबरोबर घरासंबंधीच्या अनेक फसवणुकींना आळा बसला आहे. घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना अधिक विश्वासहार्य व्यक्तींकडून घर खरेदी करणे सोयीचे आणि फायद्याचे वाटत आहे. रेराच्या नियमानमुळे सर्वसामान्य व्यक्तींना घर खरेदी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत नाहीये.

किमतीत मिळते मोठी सूट :
बांधकाम सुरू असतानाच घर खरेदी करण्याचा सर्वात मोठा कायदा म्हणजे तुम्ही प्रकल्पामधील सर्व गोष्टी बांधकाम करताना अर्थ तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. ज्यामध्ये तुम्हाला घराचा दर्जा तपासण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार वास्तुकला देखील बनवून घेऊ शकता. त्याचबरोबर बांधकामाधिन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते.

पेमेंटमधील लवचिकता ठरते फायद्याची :
बांधकामाधिन प्रकल्पांमध्ये तुम्हाला पेमेंट करण्यासाठी जास्तीचा वेळ दिला जातो. कारण की बरेच बिल्डर गुंतवणूकदारांकडून वेगवेगळ्या हप्त्यांमधून पेमेंट घेतात. याच कारणामुळे गुंतवणूकदारांना अपार्टमेंटच्या किंमतीनुसार पैसे भरण्यासाठी वेळ मिळतो. असं केल्याने व्यक्तीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहत नाही आणि घराचं पेमेंट देखील व्यवस्थित पद्धतीने होतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Knowledge 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x