 
						Railway Ticket Booking | नवीन वर्ष सुरू झालं आहे दरम्यान आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी ऑफर ठेवली आहे. यामध्ये प्रवाशांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसं पाहायला गेलं तर आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना विविध ऑफर अनुभवायला मिळत असतात. 50% पर्यंत काढलेल्या आयआरसीटीसीच्या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
AI चॅटबॉटद्वारे मिळवता येईल संपूर्ण ऑफर्सची माहिती :
1. प्रवास करताना रेल्वेचे तिकीट बुक करण्यापासून ते तिकीट रद्द करण्यापर्यंत आणि इतरही सर्व सुविधांचा लाभ घेण्याकरिता AskDisa 2.0 या नावाच्या AI चॅटबॉटद्वारे घेतले जाऊ शकतात.
2. या एप्लीकेशनद्वारे तुम्हाला रेल्वे संबंधित म्हणजेच रेल्वे तिकीट संबंधित संपूर्ण माहिती आरामशीर मिळून जाईल.
3. त्याचबरोबर रेल्वेच्या नवीन माहितीसाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. रेल्वेचे संपूर्ण नवनवीन ऑफर्स तुम्हाला इथे जाणून घेता येणार आहेत.
4. दरम्यान या एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे डेस्टिनेशन देखील तपासता येणार आहे. त्याचबरोबर बोर्डिंग स्टेशन देखील चेक करता येणार आहे.
5. तुम्ही विद्यार्थी वर्ग असाल तर आणखीनच उत्तम. कारण की तुम्हाला तिकीट बुकिंगवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
6. एवढेच नाही तर, स्लीपर क्लासचे तिकीट बुक केले तर बेस किरायावर तुम्हाला 50% डिस्काउंट दिले जाऊ शकतो. त्याचबरोबर एसी क्लासचे तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला 25 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जातो.
नमूद केलेली माहिती आयआरसीटीसीने आणि भारतीय रेल्वेने जाहीर केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याआधी विद्यार्थी वर्गाने संपूर्ण नियम आणि अटींचे पालन करून त्याचबरोबर कागदपत्रे देखील तपासून अधिकृत माहितीचा तपशील घ्यावा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		