 
						Rent Agreement | बरेच लोक मुंबईत स्वतःचा हक्काचं घर मिळवण्यासाठी त्याचबरोबर नोकरीकरिता मुंबईसारख्या शहरी ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहणे पसंत करतात. आजच्या घडीला बहुतांश व्यक्ती भाड्याच्या खोलीतच राहत आहेत. भाडेकरू म्हणून राहण्याचा एक मात्र फायदा असा होतो की, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे जागा बदलून एक्सप्लोर करू शकता परंतु प्रत्येकालाच भाड्याने राहण्याचा अनुभव चांगला येत नाही.
भाडेकरू म्हणून राहताना बऱ्याच व्यक्तींना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. तुम्ही सुद्धा भाड्याने रूम घेऊन राहण्याचा विचार करत असाल तर, आणि सांगितलेल्या या गोष्टींकडे लक्ष द्या. कोणत्याही अडचणीत पडणार नाही.
लिखित करार :
रूम भाड्याने देण्याआधी आणि भाडेकरूने देखील रूमवर राहण्याआधी भाड्याचा लिखित करार करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या भाडेकरारात भाड्याची रक्कम, त्याचबरोबर इतर गोष्टी नमूद केलेल्या असतात. तुम्हाला भाडेकरारामुळे भविष्यात होणारे वाद टाळायचे असतील तर, रीतसर भाडेकरार करून घ्या.
सुरक्षेसाठी डिपॉझिट :
बरेच घरमालक भाड्याने रूम देण्याआधी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून काही रक्कम स्वतः जवळ ठेवून घेतात. या ठेवीच्या सर्व अटी तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की वेळ आल्यानंतर गरम मालकांना भाडेकरूची संपूर्ण ठेव व्याजासकट परत करावी लागते.
करार कालावधी :
बहुतांश भाडेकरार 12 महिन्यांऐवजी 11 महिन्यांसाठीच केले जातात. भाड्यामधील पुढे होणारी गुंतागुंता टाळण्यासाठी असं केलं जातं.
भाडे देय अटी :
भाडेकरारमध्ये तुम्ही भाडे देण्याचे संपूर्ण तपशील त्याचबरोबर अटी व्यवस्थितपणे नमूद करा. यामध्ये वेळोवेळी भाडे भरण्याची तारीख, पेमेंटची पद्धत त्याचबरोबर उशिरा पेमेंटसाठी कोणत्या प्रकारचे दंड भरावे लागणार याबद्दलची सर्व माहिती गेली असते.
कायदेशीर पालन :
तुमच्या भाडेकरारातून हे समोर आलं पाहिजे की, तुम्ही स्थानिक कायदे आणि नियमांचे व्यवस्थित पालन करत आहात. त्याचबरोबर भाडेकरूच्या जबाबदाऱ्यांबद्दल देखील सर्व माहिती नमूद केलेली असावी.
भाडे वाढवण्याची माहिती :
भाडेकरारामध्ये कोणत्या विशिष्ट काळानंतर भाडं वाढवण्यात येईल याची देखील माहिती नमूद केलेली असावी. घरमालक भाडेकरार केल्याच्या 11 महिन्यानंतरच भाडे वाढवू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		