 
						Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असते. त्याचबरोबर हे अकाउंट कंपनीकडूनच उघडण्यात येते. जेणेकरून प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार त्याच्या साजरी अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता यावा. त्याचबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊक असेल की, सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सची सर्वप्रथम आणि महत्त्वाची सुविधा अनुभवता येते. तसं पाहायला गेलं तर सॅलरी अकाउंट हे प्रकारचे सेविंग अकाउंटच असते परंतु सेविंग अकाउंटपासून थोडे वेगळे असते. आज आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंट कोणकोणत्या सुविधा प्रदान करते त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.
लोन घेण्यास सोपे जाते :
सॅलरी अकाउंटवरून कर्मचाऱ्याला लोनची सुविधा अगदी सहजपणे प्राप्त होते. कारण की सॅलरी अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला तुमचे पैसे क्रेडिट होत असतात. यामुळे बँकेला तुमच्यावर विश्वास ठेवण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. यामध्ये कर्मचारी होम लोन, कार लोन कोणत्याही प्रकारचे लोन अगदी सहजपणे घेऊ शकतो.
लॉकर चार्जवर सूट :
बहुतांश बँका कर्मचाऱ्यांना सॅलरी अकाउंटवर लोकर चार्जवर सूट देतात. परंतु एसबीआयचे बँक खाते कर्मचाऱ्यांना सॅलरी अकाउंटवर केवळ 25% टक्क्यांपर्यंतच सूट देते. सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर, लॉकर चार्जवर सूट आहे की नाही याची पडताळणी करा.
वेल्थ सॅलरी अकाउंट :
बऱ्याच व्यक्तींकडे भरपूर सारे पैसे असतात परंतु या पैशांची विल्हेवाट किंवा पैसा नेमका कुठे ठेवावा हेच कळत नाही. तुमची सुद्धा अशीच काहीशी कंडिशन असेल तर, तुम्ही वेल्थ सॅलरी अकाउंट हा पर्याय निवडू शकता. यामध्ये तुम्हाला बँकेकडून वेल्थ मॅनेजर प्रोव्हाइड करण्यात येतो. जो तुमच्या बँकेचा सर्व कारभार पाहण्यास सक्षम असतो.
या मोफत सुविधांचा लाभ देखील मिळतो :
सॅलरी अकाउंट होल्डरला मोफत सुविधांमध्ये नेटबँकिंग, पासबुक, चेकबुक या सर्व सुविधा मोफत दिल्या जातातच. सोबतच पैसे क्रेडिट झाल्यानंतर येणाऱ्या एसएमएसवर देखील कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.
ओवरड्राफ्टची सुविधा :
सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला ओवरड्राफ्टची सुविधा देखील अनुभवता येते परंतु यामध्ये दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ झाल्यानंतरच कर्मचारी ओवरड्राफ्टच्या सुविधेसाठी पात्र ठरतो. या सुविधेची कमाल म्हणजे तुमच्या खात्यात कोणत्याही प्रकारची रक्कम शिल्लक नसेल तरीसुद्धा तुम्ही एका लिमिटपर्यंत पैसे काढू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		