12 December 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Bank of Maharashtra FD Interest | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, पटापट FD चे बदलेले नवे दर तपासून घ्या

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra FD Interest | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात बदल केला आहे. या बदलानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्र 7 दिवस ते 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवीवर 2.75% ते 5.75% पर्यंत व्याज दर देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र 200 दिवसांच्या ठेवीवर आता जास्तीत जास्त 7 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन एफडी दर 17 एप्रिल 2023 पासून लागू आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या एफडीचे दर
7 ते 30 दिवसांच्या मुदत ठेवींवर बँक 2.75 टक्के आणि 31 ते 45 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवर बँक ऑफ महाराष्ट्र 3 टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ४६ ते ९० दिवसांच्या ठेवीवर ३.५० टक्के आणि ९१ ते ११९ दिवसांच्या ठेवीवर ४.५० टक्के व्याज देत आहे.

120 ते 180 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.75 टक्के आणि 181 ते 270 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 5.35 टक्के व्याज मिळेल. बँक २७१ ते ३६४ दिवसांच्या मुदतीच्या मुदत ठेवींवर ५.६० टक्के, तर बँक ऑफ महाराष्ट्र एका वर्षात मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर ६.३५ टक्के व्याज देण्याचे आश्वासन देत आहे.

एक वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर बँक ऑफ महाराष्ट्र ६ टक्के आणि तीन ते पाच वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर ५.७५ टक्के व्याज दराची हमी देईल. बँक ऑफ महाराष्ट्र २०० आणि ४०० दिवसांच्या विशेष मुदतीवर अनुक्रमे ७ टक्के आणि ६.७५ टक्के व्याज दर देणार आहे.

Bank-of-Maharashtra-FD-Rates

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bank of Maharashtra FD Interest changed check details on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x