14 May 2025 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

Salary Account Alert | 90 टक्के नोकरदारांना माहित नाही सॅलरी अकाउंटचे फायदे, सुविधा ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क

Salary Account Alert

Salary Account Alert | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आणि पगार घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे बँकेत सॅलरी अकाउंट असते. सॅलरी अकाउंटमध्ये कंपनी प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याला त्याने काम केल्या बदली मोबदला देते. तरीही अनेक व्यक्तींच्या मनात सेविंग अकाउंट आणि सॅलरी अकाउंट या दोन्ही गोष्टींबद्दल शंका असते. सॅलरी खात्याचा पगारदार व्यक्तीला नेमका काय फायदा होतो हे आज आपण पाहणार आहोत.

सॅलरी अकाउंटचे फायदे जाणून घ्या :

1. पगार घेणाऱ्या आणि सॅलरी अकाउंट असलेल्या व्यक्तीला सॅलरी अकाउंटचे विविध फायदे त्याचबरोबर विविध सुविधा अनुभवायला मिळतात. बँकेकडून सॅलरी खात्यावर कर्मचाऱ्याला नेट बँकिंगच्या सुविधा, फ्री चेकबुक, एटीएम, त्याचबरोबर क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येतो.

2. त्याचबरोबर सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्स अमाऊंटची सुविधा मिळते. म्हणजेच काय तर तुमच्या खात्यामध्ये एक रुपया जरी शिल्लक नसेल तरीसुद्धा अगदी 3 महिन्यांपर्यंत तुमच्या खात्याला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाहीत. तुमचे खाते बंद केले जात नाही.

3. सॅलरी खात्यात तुम्हाला फ्री एटीएम ट्रांजेक्शनची सुविधा देखील मिळते. यामध्ये आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक, एचडीएफसी बँक यांसारख्या इतर बँकांचा समावेश असतो. फ्री एटीएम ट्रांजेक्शन म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेतून ठराविक रक्कमेच्या अधिक रक्कम जरी काढली तरीसुद्धा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.

4. तुम्ही देखील सॅलरी अकाउंट वापरत असाल तर, तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होते. तुमचे अकाउंट स्टेटमेंट बँकेकडे असल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासत नाही. अशावेळी तुम्हाला चटकन कर्ज मिळते.

5. काही खाजगी त्याचबरोबर सरकारी बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने मोफत व्यवहार करण्याची सुविधा प्राप्त करते. सध्याच्या घडीला IMPS त्याचबरोबर स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात परंतु NEFT आणि RTGS सुविधा तुम्हाला मोफत मिळतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Account Alert Sunday 12 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Salary Account Alert(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या