 
						SBI Home Loan | घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येक व्यक्तीचे असते. काही व्यक्ती घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी आयुष्याची जमापुंजी खर्च करतात. दरम्यान भारताची सर्वांत नावाजलेली बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर आकर्षक व्याजदर प्रदान करत आहे. त्याचबरोबर गृह कर्जासाठी फायदेशीर योजना देखील प्रदान करते.
बहुतांश व्यक्ती आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी एसबीआय बँकेकडून गृह कर्ज घेण्याकडे वळाले आहेत. एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला 35 लाख रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले तर, तुमचा मासिक पगार किती असायला हवा याबाबत माहिती सांगणार आहोत.
SBI नियमांनुसार गृह कर्ज घेण्यासाठी मासिक पगार किती असावा :
SBI किंवा इतर कोणतीही बँक गृह कर्ज देताना सर्वप्रथम ग्राहकाचे उत्पन्न तपासते. त्याचबरोबर त्याचा सिबिल स्कोर मेंटेन आहे की नाही याची देखील माहिती घेते. कोणतीही बँक तुमच्या पगाराच्या 40 ते 50% रक्कम EMI भरण्यासाठी ग्राह्य धरते.
35 लाखांच्या गृह कर्जासाठी केलेली गणना :
समजा एखाद्या व्यक्तीला एसबीआय बँकेकडून 35 लाखांचे गृह कर्ज मंजूर करण्यात आले. गृह कर्जाचे व्याजदर 8.5% गृहीत धरल्यास त्याचबरोबर कर्ज परतफेडीचा कालावधी 20 वर्षे पकडल्यास तुम्हाला 30 ते 32 हजार रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागू शकतो. अशा रीतीने तुमचा मासिक पगार किमान 75,000 ते 80,000 रुपये असावा.
35 लाखांचे गृह कर्ज मंजूर झाल्यानंतर कितीचा हप्ता भरावा लागेल जाणून घ्या : 
एखाद्या व्यक्तीने 35 लाखांचे गृह कर्ज 20 वर्षांच्या काळासाठी घेतले तर, ग्राहकाला 30,374 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो. अशा पद्धतीने संबंधित ग्राहक व्याज स्वरूपी 37 लाख 89 हजार 715 रुपयांचे व्याज द्यावे लागेल.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		