 
						SBI Home Loan | भारतातील सर्वात मोठी आणि नावाजलेली बँक म्हणजेच एसबीआय बँक. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ही भारताची नंबर 1 बँक आहे. एसबीआय बँकेत बहुतांश व्यक्तींचे खाते आहे. या बँकेने आतापर्यंत आपल्या बऱ्याच ग्राहकांना आकर्षक व्याजदरात गृह कर्ज दिले आहेत. अशातच आज आपण एसबीआयच्या गृह कर्जाच्या व्याजदराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सध्याच्या घडीला घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच मोठ्या प्रमाणात लोक घर खरेदीसाठी बँकांकडून गृह कर्ज देखील घेत आहेत. एसबीआय ही बँक देशातील सर्वात मोठी बँक असून आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याकरिता सध्या अगदी स्वस्तात मस्त गृह कर्जावर व्याजदर देत आहे. तुम्हाला हे आकर्षक व्याजदर नक्कीच आवडेल.
SBI गृह कर्जाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या :
एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत कर्ज व्याजासकट परतफेडीचा कालावधी देते. दरम्यानही बँक 8.50% दराने आपल्या ग्राहकांना गृह कर्ज देण्याचा प्रयत्न करते. एवढेच नाही तर कमी कमी टक्क्यांच्या परताव्याच्या व्याजदराचे कर्ज केवळ त्याच व्यक्तींसाठी असते ज्यांचा सिबिल स्कोर 800 च्या दरम्यान पाहायला मिळतो. आज या बातमीपत्रातून आपण 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घ्यायचे असल्यास नोकरदार वर्गाला किती रुपये पगार असायला हवा त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
30 लाखांचे गृह कर्ज मिळवण्यासाठी किती पगारा असावा :
ज्या व्यक्तीला 30 लाखांचे गृह कर्ज हवे आहे त्या व्यक्तीला किमान 51 हजार रुपयांपर्यंत पगार असणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर अतिशय उत्तम असेल आणि सोबतच 51,000 रुपयांचा मासिक पगार असेल तर, त्या व्यक्तीला 8.50% दराने गृह कर्ज देण्यात येते. तुमच्यावर आधीच एखादे कर्ज असेल तर, तुम्हाला 51,000 रुपयांचा पगार असून देखील 30 लाखांचे कर्ज अमान्य करण्यात येते.
प्रत्येक महिन्याला किती रुपयांचा EMI भरावा लागेल :
समजा ग्राहकाला 30 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले आणि कर्ज 8.50 टक्क्यांना मंजूर करण्यात आले तर कर्जदाराला मासिक ईएमआय हप्ता 22500 रुपयांचा भरावा लागू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एसबीआयच्या बँकेतून गृह कर्ज घेऊन आकर्षक व्याजदर प्राप्त करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		