25 March 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई, शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Rattan Power Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक, यापूर्वी 586 टक्के परतावा दिला, पॉवर कंपनी फोकसमध्ये - NSE: RTNPOWER IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

SBI Salary Account | सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक सुविधा, फार कमी लोकांना माहित, मिळतात अनेक फायदे - Marathi News

SBI Salary Account

SBI Salary Account | सॅलरी अकाउंट हे एक प्रकारचे सेविंग अकाउंटच असते. ज्यामध्ये एटीएम, चेकबुक, नेटबँकिंग आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरीसुद्धा सॅलरी आणि सेविंग या दोन्हीही अकाउंटमध्ये थोडाफार फरक असतो. आज आपण या बातमीपत्रातून सॅलरी अकाउंटच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया सॅलरी अकाउंटचे जबरदस्त फायदे.

1) झिरो बॅलन्स सुविधा :
सॅलरी अकाउंटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सची सुविधा मिळते. सेविंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्सची लिमिट दिली जाते. ही लिमिट पूर्ण नसेल तर तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस घेण्यात येतात. परंतु झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.

2) लोनची सुविधा :
सॅलरी अकाउंटमध्ये रिस्कचा धोका अजिबात नसतो. त्यामुळे तुम्ही कार लोन, होम लोन किंवा पर्सनल लोन अगदी सहजपणे काढू शकता. त्याचबरोबर सॅलरी अकाउंट आणि तुमचं स्टेटमेंट या गोष्टींमुळे तुमचे प्रामाणिक डॉक्युमेंट अगदी सहजपणे बनते. त्यामुळे तुम्हाला चटकन लोनची सुविधा प्राप्त होण्यास मदत होते.

3) ATM मधून करू शकता मोफत ट्रांजेक्शन :
सॅलरी अकाउंटमध्ये तुमच्याकडून एटीएमवर वार्षिक चार्जेस आकारले जात नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला फ्री एटीएम ट्रांजेक्शनची सुविधा मिळते. ज्यामध्ये एसबीआय, एचडीएफसी यांसारखे अनेक बँकांचा समावेश आहे.

4) वेल्थ सॅलरी अकाउंट :
समजा तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत तर, तुम्ही वेल्थ सॅलरी अकाउंट देखील उघडू शकता. हे अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला डेडिकेटेड वेल्थ मॅनेजर देखील प्रोव्हाइड केले जातात. जो बँकेच्या कामकाजाचे सर्व काम पाहतो.

5) लॉकर चार्जेसची सुविधा :
सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला लॉकर चार्जेसची सुविधा देखील दिली जाते. ही सुविधा 25 टक्क्यांने दिली जात असून दीर्घकाळापर्यंत तुमच्या खात्यात कोणत्याही प्रकारची सॅलरी जमा झाली नाही तर तुमच्याकडून ही सुविधा काढून देखील घेण्यात येते. त्यानंतर तुमचं अकाउंट हे सेविंग अकाउंट प्रमाणेच सुरू राहते.

Latest Marathi News | SBI Salary Account 20 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI Salary Account(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या