1 May 2025 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

सोमय्यांना काही माहिती नसावी | चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेंच्या सांगण्यावर केलं असेल - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, १३ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.

सोमय्यांना काही माहिती नसावी, चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेंच्या सांगण्यावर केलं असेल – BJP leader Chandrakant Patil and Samarjeet Ghatge is behind allegations of Kirit Somiya said minister Hasan Mushrif :

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ म्हणाले, “किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल:
मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती. मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती. या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले.

मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार. चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Chandrakant Patil and Samarjeet Ghatge is behind allegations of Kirit Somiya said minister Hasan Mushrif.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या