27 September 2020 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी सामान्यांची लूट आणि राज्यातील मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही | मनसेकडून संताप सामान्यांची लूट आणि मंत्र्यांशी सेटलमेंट? राज्यातील १५ मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही खोट्या कागदपत्रांद्वारे ट्रॅफीक पोलिसांना फसवणं विसरा | तुमची सर्व कागदपत्रं पोलिसांकडे मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?
x

मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला मुलाखत दिली का? - शिवसेनेचं प्रतिउत्तर

Shivsena, former MLA Rajesh Kshirsagar, BJP State president Chandrakant Patil

मुंबई, २७ जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर काल भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली होती. ‘चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले होते.

यावरून शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. त्यांनी सोमवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी, असे क्षीरसागर यांनी म्हटले.

तसेच चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला बाईट दिला का, हे सांगावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.

 

News English Summary: Narayan Rane has experienced the end of those who criticize Matoshri. Shiv Sena leader Rajesh Kshirsagar warned Chandrakant Patil to keep this in mind.

News English Title: Shivsena former MLA Rajesh Kshirsagar criticize BJP State president Chandrakant Patil News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x