2 May 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
x

मुंबईत इमारत कोसळून 3 ठार | तर रायगडमध्ये दरड कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू

Konkan rain

मुंबई, २३ जुलै | मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नागपूरच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी मुंबईला लागून असलेल्या गोवंडीमध्ये इमारत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील राजवाडी व शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगडच्या काळई गावात भूस्खलनामुळे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून इतर लोक अजूनही अडकलेले आहेत.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळई गावात दरड कोसळली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. लोकांना वाचवण्यासाठी पाण्यात बुडलेल्या रस्त्यावर नौका चालवल्या जात आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळई गावात गुरुवारी दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळाली असून एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. भोर-महाड मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra rain flood in Konkan in Mumbai Govandi area building collapsed news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या