मुख्यमंत्र्यांच्या समोरच नाराज आ. भास्कर जाधवांनी सेना खासदाराचा हात झटकला

रत्नागिरी: ‘ज्या शिवनेरीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद माझ्याकडे आले हा एक चमत्कार आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते उमरठ, पोलादपूर येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचे लोकार्पण सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.
व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर भास्कर जाधव व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला मात्र भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांचा हात झटकला. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासदेखील टाळाटाळ केली.
त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत आज देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आंगणे कुटुंबियांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. pic.twitter.com/mAODWsrrL1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 17, 2020
Web Title: Story Chief Minister Uddhav Thackeray at Ganpatipule local Shivsena MLA Bhaskar Jadhav anger over MP Vinayak Raut.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jindal Stainless Share Price | एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?
-
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
-
Hilton Metal Share Price | हिल्टन मेटल फोर्जिंग शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, मागील 3 वर्षांत 1500 टक्के परतावा दिला
-
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 24 मे 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
-
Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय?
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?
-
Adani Group Shares | अदानी ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, गुंतवणूकीपूर्वी सर्व शेअर्सची कामगिरी पाहा
-
Loksabha 2024 Agenda | विरोधी पक्षाचे बडे चेहरे बिहारच्या राजधानीत जमणार, नितीश कुमार देणार नवा फॉर्म्युला, काय आहे अजेंडा
-
Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले
-
Stocks To Buy | हे 3 शेअर्स अल्पावधीत मालामाल करतील, 41 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, फायदा घेणार?