22 September 2020 6:56 PM
अँप डाउनलोड

ज्यांच्या नावातच गुलाब आहे, त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये - आ. नितेश राणे

BJP leader Nitesh Rane, Shiv Sena leader Gulabrao Patil, MP Narayan Rane

मुंबई, १० ऑगस्ट : नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं. शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती.

नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. या टीकेनंतर आमदार नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले की, ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा, असं नितेश राणे यांनी सांगितले. तसेच टीका करायला ते दिवसातून किती तास शुद्धीत असतात. हे शुद्धीत कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, अशी खोचक टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

 

News English Summary: Narayan Rane has now become a well-educated unemployed politician. They have no work left. So they speak differently first, then some. Narayan Rane wants to increase the speaking TRP, he has no other business left said Gulabrao Patil.

News English Title: BJP leader Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Gulabrao Patil News latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x