मनसेच्या कार्यसम्राट नगरसेवकाची पक्षांतर्गत गळचेपी | समाज माध्यमांवर घुसमट व्यक्त केली
पुणे, १० ऑगस्ट : पुणे मनसेतील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी समाज माध्यमांवर पक्षांतर्गत होणारी घुसमट व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्यानंतर नगरसेवक वसंत मोरे हेच मनसेची ओळख असल्याचं सर्वश्रुत आहे. केवळ लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेली विकास कामं एवढीच त्यांची ओळख नसून, स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते देखील आपल्यासोबत राजकारणात कसे मोठे होतील यासाठी कार्यशाळा घेणारे नगरसेवक ही देखील त्यांची ख्याती आहे. त्यामुळे जमिनीवर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता वसंत मोरे यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.
चिरीमिरी, आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी फुटतील असं वसंत मोरे यांचं व्यक्तिमत्व नाही हे देखील दुसरं वास्तव असलं तरी, त्यांनी केलेल्या पोस्टमुळे स्थानिक पातळीवर मनसेत नेमकं काय घडतं याचा अंदाज येऊ शकतो. पक्षात जनमानसाची कामं करणाऱ्या नेत्यांची कशी गळचेपी होते आणि आपल्याच लोकांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी पक्षातीलच काही नेते मंडळी कशी झटत असतात यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावरच पक्ष कशी मोठ्या पदांची खैरात करतो आहे यावर त्यांनी नेमकं बोट ठेवलं आहे. त्यामुळे मनसेतील अनेकांना माहित नसलेलं वास्तव वसंत मोरे यांनी थोडक्या शब्दात समोर आणलं आहे असंच म्हणावं लागेल.
वसंत मोरे यांना २०१७ची महानगरपालिका निवडणूक आणि २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी पक्षातील काही लोकांनी भाजपाला साथ दिली होती आणि त्याच लोकांवर कोरोना आपत्तीच्या आडून मोठ्या पदांची खिरापत करण्यात आल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. प्रसार माध्यमांकडे देखील यापूर्वीच मनसेतील याच लॉबीबद्दल माहिती होती, जे अनेकांच्या पराभवास विविध निवडणुकीत कारणीभूत असतात. नाशिकमध्ये चांगली कामं करून देखील याच लॉबीमुळे पक्षाची सत्तातर गेली, पण त्यासोबत पक्षात निवडून येणाऱ्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला होता. आज वेळ अशी आली आहे की एकेकाळी सत्ता असलेल्या नाशिकमध्ये शिवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला शहरअध्यक्ष पद बहाल करावं लागलं आहे. अनेक शहरांमध्ये निवडणुकीचं तिकीट मिळत असताना देखील अनेकजण निवडणूक लढण्यास नकार देतात, त्याला देखील मनसेतील हीच लॉबी कारणीभूत असल्याचं कार्यकर्ते ऑफ स्क्रीन बोलून दाखवतात.
पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे मोजकेच पदाधिकारी मनसेत आहेत ज्यामध्ये नगरसेवक वसंत मोरे, आ, राजू पाटील, ठाण्याचे अविनाश जाधव, राजू उंबरकर आणि वैभव खेडेकर यांचा समावेश आहे. मात्र त्यातीलच एका कार्यसम्राट नगरसेवकाने स्वतःच ही खदखद व्यक्त केल्याने पक्षाची झोप उडू शकते. स्थानिक कार्यकर्त्यांकडून ऑफ स्क्रीन मिळालेल्या माहितीनुसार, मनसेतील काही वरिष्ठ नेत्यांची लॉबी पक्ष नैत्रुत्वाच्या जवळची असल्याने स्थानिक पातळीवर अनेक निर्णय इतरांना गृहीत धरून घेतात.
मनसेतील हीच लॉबी ना कधी कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर लढताना दिसत, नाही त्यांना कोणत्याही निवडणुका लढविण्यात रस असतो. मात्र कोणत्याही निवडणूका आल्या की लॉबी कार्यरत होते आणि पक्षविरोधात कामं सुरु करून, आर्थिक फायद्यासाठी विरोधी पक्षासाठी कामं करतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत एकूण २-३ लाख मतं मिळूनही छोट्या पक्षांचे २-३ आमदार सहज निवडून येतात. मात्र मनसेला एकूण १२-१५ लाख मतं पडली तरी एक आमदार निवडून येताना दमछाक होते. कारण कामं करणारे उमेदवार त्यांच्या जनमानसातील कामांवर मतं पदरात पाडून घेत असताना, ही मंडळी दुसऱ्या बाजूला विरोधकांना मदत करून स्थानिक पातळीवर निर्णायक मतं मिळूच देत नाहीत. परिणामी असे निकाल लागत असल्याचं कार्यकर्त्यांचं मतं आहे.
मनसेच्या प्रगतीमध्ये खरी अडचण प्रामाणिक पक्ष नैत्रत्व, लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते किंवा वसंत मोरे यांच्यासारखे पक्ष हित आणि पक्ष विस्तारासाठी झटणारे पदाधिकारी कधीच नव्हते. पक्षाची खरी अडचण हीच लॉबी आहे जी अधिकारांचा गैरवापर करून स्वतःच्या मर्जीतील आणि इशाऱ्यावर कामं करणाऱ्यांवर पदांची खैरात करतात आणि निवडणुका आल्यावर कार्यरत होतात. परिणामी वसंत मोरे यांच्यासारख्या प्रामाणिक पदाधिकाऱ्याची खदखद नेमक्या त्याच अनुभवातून समोर आल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे पक्ष नैतृत्वाने वेळीच यामध्ये लक्ष घालावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण लवकरच राज्यात महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा आहेत.
News English Summary: Pune MNS Karyasamrat corporator Vasant More has expressed concern over the infiltration of the party on social media. In Pune after Raj Thackeray, corporator Vasant More is the well known identity of MNS.
News English Title: MNS Pune corporator Vasant More not happy about local politics of MNS leaders News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या