20 June 2021 10:05 PM
अँप डाउनलोड

अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर मुलांना हक्काचं मैदान; मनसे तयारी सुरु

MNS Corporator Vasant More, Raj Thackeray

कात्रज: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी त्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान मिळाले यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून, त्यावर त्यांचे विशेष लक्ष देखील आहे. नगरसेवक वसंत मोरे यांचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांच्याबाबतीत चांगलाच बोलबाला आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक विकास कामं वेळेत पूर्ण करून स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानुसार या वर्षीच्या उन्हाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर कात्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान तयार होणारच असा निश्चय नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. त्यासाठी एकूण ३ जेसीबी लावून काम पूर्ण करण्याची जोरदार तयारी सुरु आहे.

मनसे नगरसेवक वसंत मोरे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदारपणे तयारीला लागले असून विकास कामांसोबत त्यांनी स्थानिक पातळीवर पक्ष वाढीवर देखील लक्ष केंद्रित केलं असून, तरुणांना मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश देखील दिले जात आहेत.

 

Web Title:  MNS Corporator Vasant More took initiate for Katraj road playing ground for children.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x