11 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

Vikram Kumar Transferred, Pune Shekhar Gaikwad, Sugar Commissioner

पुणे, ११ जुलै : महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.

यामध्ये पुणे महापालिकेत शेखर गायकवाड येण्यापूर्वी ते साखर आयुक्त म्हणून काम पाहत होते. आता पुन्हा त्याच पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. तर त्यांच्या जागी असलेले सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची पुणे महापालिकेतून साखर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. आता त्यांची विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

विक्रम कुमार हे २००४ च्या आयएएस अधिकारी आहेत. पीएमआरडीएचे तात्कालीन आयुक्त किरण गित्ते यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. आता ते पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहे. त्यांच्यासमोर पुुणे शहरात वेगाने फोफावत चाललेली कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

 

News English Summary: Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad has been transferred as Sugar Commissioner and Vikram Kumar of PMRDA has been transferred as Commissioner. Saurabh Rao has been appointed as Pune Divisional Commissioner.

News English Title: Vikram Kumar Has Been Transferred As The New Municipal Commissioner Of Pune Shekhar Gaikwad As The Sugar Commissioner News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x