18 May 2021 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 रुग्णांची कोरोनावर मात | तर 4,334 रुग्णांचा मृत्यू लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट'
x

मोदी-शहांवरील अतिआत्मविश्वास भाजपाला नडतो आहे? सविस्तर वृत्त

PM Narendra Modi, Amit Shah, Jharkhand Election 2019

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने हिंदी भाषिक पट्ट्यातील अजून एक महत्वाचं राज्य गमावलं आहे. यावर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरु असून मुख्य कारणं शोधण्याची प्रक्रिया पार पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर अनेक धक्कादायक विषय समोर येत असून तीच प्राथमिक स्तरावर पराभवाची कारणं असल्याची खात्री वरिष्ठांना आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

झारखंड मध्ये आदिवासी मतदार मोठ्या संख्येने असून देखील मोदी-शहांनी आत्मविश्वासाने राष्ट्रीय मुद्देच भाषणांत रेटले आणि स्थानिक प्रश्न तसेच राहून गेल्याने विरोधकांनी नेमका त्याचाच फायदा घेत स्थानिक राजकारण ढवळून काढल्याचं पाहायला मिळालं. तसेच मोदी आणि शहांच्या सभांनी विजय मिळेल या भ्रमात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहिले आणि उलटपक्षी जिथे मोदी शहांच्या सभा झाल्या तिथलेच उमेदवार पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. झारखंड सारख्या विकसित नसलेल्या राज्यात समाज माध्यमांचा प्रचारासाठी अति वापर करत, जमिनीवरील विषय दुरावले तिथेच घात झाला.

मोदी-शहा जोडी सर्व राज्यांमध्ये निर्णय क्षमता असणारा मुख्यमंत्री कधीच बसवत नाहीत, केवळ मोदी-शहा जेवढं सांगतील ते करत जाणारी व्यक्ती मुख्यमंत्री बसवली जाते आणि अप्रत्यक्षपणे संबंधित राज्य स्वतःच्या नियंत्रणात घेतलं जात. त्यासाठी संबंधित मुख्यमंत्र्यांना देखील अमर्याद स्वातंत्र दिलं जातं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय, तिकीट देण्याचे-कापण्याचे अधिकार, आघाडी करण्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करण्याचं काम भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आलं.

विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर पैसा आणि जाहिरातबाजी करून देखील काहीच फायदा होताना दिसत नाही. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये होणारे पराभव पाहता या रणनीतीचा भारतीय जनता पक्षाकडून पुनर्विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे सदर विषय समोर येत असले तरी मोदी-शहा जोडी ते स्वतःपुरती किती स्वीकारतील ते पाहावं लागणार आहे. तसं ना झाल्यास २०२४ मध्ये गुजरातमध्ये देखील सुपडा साफ झाल्यास आश्चर्य वाटायला नको असं तज्ज्ञांचं मत आहे.

 

Web Title:  Jharkhand Assembly Election 2019 has given Big Set Back to PM Narendra Modi and Amit Shah.

हॅशटॅग्स

#Amit Shah(256)#Narendra Modi(1546)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x