3 December 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
x

देवेंद्र फडणवीस दबंग नेता | 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे, २० सप्टेंबर | भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गुपचूप आलेल्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता असून ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य त्यांनी केले. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस दबंग नेता, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात – Devendra Fadnavis real Dabangg leader who kept 100 Ajit Pawar in his pocket says Chandrakant Patil :

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलाही नेता धुतल्या तांदळासारखा होतो का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘असं काहीही नाही. नारायण राणेंवर कारवाई करायची की नाही, हे आता राज्य सरकारवर अवलंबून आहे. त्यांना वाटलं तर ते कधीही कारवाई करू शकतात. आणि अजित पवार यांच्यावरील कारवाईची प्रक्रियाही सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये अजित पवारांचे देखील नाव आहे.’

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला गृहमंत्रीपद न देण्याचा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता, असेही सांगितले. त्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला तेव्हा असाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का, अशी विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘त्याची काहीही गरज नव्हती, कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे सारखे ते करत नाहीत.’ उद्धव ठाकरेंना राज्यात काय चाललंय याचीच माहिती नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘राज्यात काय चाललंय त्याची त्यांना माहिती नसते. देवेंद्र फडणवीसांच्या वयावर जाऊ नका. शिवसेनेने त्रास दिल्यानंतर ही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष मुख्यमंत्री खूप वर्षानंतर राहिला आहे. तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र यावी यासाठी खूप प्रयत्न झाले होते. पण देवेंद्र फडणवीस या सर्वांना पुरून उरले होते.’

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Devendra Fadnavis real Dabangg leader who kept 100 Ajit Pawar in his pocket says Chandrakant Patil.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x