6 October 2022 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Tips To Reduce Dark Circles | महागड्या क्रिम्सने सुद्धा डोळ्याखालील डार्क सर्कल दुर होतं नाहीत?, नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा SBI ATM Rule | तुम्ही एसबीआय एटीएम वापरता?, रोख रक्कम काढली तर तुम्हाला 173 रुपये द्यावे लागतील असा मेसेज आला? Surya Grahan 2022 | या तारखेला होणार सूर्यग्रहण, ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींच्या लोकांच्या नशिबाची दारं उघडतील
x

VIDEO | तत्कालीन भाजपचे मंत्री मंदिरातच ST कर्मचारी प्रतिनिधींना म्हणालेले 'विलनीकरण नाही होत सोडा'

ST Mahamandal Protest

मुंबई, १० नोव्हेंबर | तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना (ST Mahamandal Protest) भावनिक आवाहन केलं.

ST Mahamandal Protest. BJP leaders have supported the strike of ST workers. Along with Gopichand Padalkar, Praveen Darekar, Kirit Somaiya, Sadabhau Khot criticized Thackeray’s government :

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं राज्यात प्रवाशांचे हाल होत असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सरकारने विलिनीकरणासाठी समितीही स्थापन केली आहे. तर दुसरीकडे संप सुरूच आहे.

दुसरीकडे भाजपने सत्ताकाळात एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मंदिरातील कार्यक्रमात याच विषयावरून झिडकारलं होतं आणि मात्र आता तेच भाजप नेते स्वतःची राजकीय पोळी भाजून घेताना दिसत आहेत असं म्हणायला हरकत नाही. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केलाय.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकारला सहानुभूती आहे. शिवसेना कामगार क्षेत्रातून जन्माला आली आहे. शिवसेना कष्टकऱ्यांचे नेतृत्व करते. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजप एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत आहेत. आम्हाला कामगारांचे प्रश्न कुणी शिकवण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहनही राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते मुनगंटीवार त्यावेळी:

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ST Mahamandal Protest with support of BJP leaders.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x