14 December 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA
x

चंद्रकांतदादांची लायकी सव्वा रुपयाची, कोट्यवधीची नाही | सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, २२ सप्टेंबर | भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर विविध आरोप करत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण हे तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये देखील शाब्दीत युद्ध सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. याला पाटलांनी उत्तर देत राऊतांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी पीएमसी घोटाळ्यासंदर्भात राऊतांवर आरोप केले होते. आता या आरोपांना संजय राऊतांनी उत्तर देत अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांतदादांची लायकी सव्वा रुपयाची, कोट्यवधीची नाही, सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – Shivsena MP Sanjay Raut will file defamation case against Chandrakant Patil over allegations regarding PMC Bank :

चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लिहिलेल्या पत्राविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांनी आमच्या एका अग्रलेखावर पत्र पाठवले आहे. आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांना आमच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचे पत्र आम्ही आजच्या सामनामध्ये प्रसिद्ध केले आहे. जेणेकरून पाटलांची विषारी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळेल’

सव्वा रुपयांचा दावा ठोकणार:
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ‘पीएमसी बँक घोटाळ्याविषयी पाटील यांनी पत्रात जे आरोप केलेले आहेत ते मला मान्य नाही. असले फालतू धंदे आम्ही करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर एवढी वर्ष राजकात टीकलो नसतो. तसेच पाटील यांनी जे आरोप केले आहेत, त्यावरुन त्यांना येत्या चार दिवसांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे’ अशी टीका राऊतांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Shivsena MP Sanjay Raut will file defamation case against Chandrakant Patil over allegations regarding PMC Bank.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x