13 May 2021 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न
x

पुणे: कात्रज गावठाण रस्ता चकाचक; नगरसेवक वसंत मोरेंचा विकास कामांचा धडाका

MNS Corporator Vasant More, Raj Thackeray

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज गावठाण जुन्या बस स्टॉप समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरील वाहनांना देखील विस्तृत रस्ता उपलब्ध झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत मनसे नगरसेवक वसंत मोरे सातत्याने नजर ठेवून असतात आणि प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचं पाहायला मिळालं आहे. नगरसेवक पदाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विकास कामांच्याबाबतीत त्याचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे. दरम्यान, काल त्यांनी महापौर कार्यालयात पक्ष नेत्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात लेक टाऊन पुलासंदर्भात काय परिस्थिती आहे याची विचारणा केली होती आणि त्यासंबंधित अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी देखील केली होती आणि विकास कामांचा संपूर्ण आढावा देखील घेतला होता.

वसंत मोरे यांच्या कल्पकतेने तयार केलेली सावित्रीबाई फुले अभ्यासिका चालू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. २६ जानेवारीला या अभ्यासिकेचे स्थानिकांना लोकार्पण होणार असल्याने त्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली.

 

Web Title:  Pune MNS Corporator Vasant More completed Katraj Gavthan Road redevelopment.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x