12 August 2020 3:36 PM
अँप डाउनलोड

स्वखर्चातून मतदाराची कामं करणारे मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि पक्षवाढीची तळमळ

MNS corporator Vasant More

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे त्यांच्या मतदारसंघात कार्यसम्राट नगरसेवक म्हणून प्रसिद्ध असले तरी अनेक कामं त्यांनी स्वखर्चाने केली आहेत याची अनेकांना माहिती नसावी. पुणे महानगरपालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्ञात असलेले नगरसेवक म्हणजे वसंत मोरे असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सरचिटणीस पदावर असले तरी वसंत मोरे यांचं पक्षाप्रतीचं कार्य हे पुण्यातील नेते पदावर बसलेल्यांना देखील जमत नसावं असंच एकूण चित्र आहे. पुण्यातील नेते पदावरील मंडळी स्वपक्षाच्या वाढीसाठी जमिनीवर काय करता येईल यापेक्षा समाज माध्यमांवर इतर पक्षातील मापं काढण्यात व्यस्त दिसतात अशी चर्चा सध्या पुण्याच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे वसंत मोरे आपल्या नगरसेवक पदाचा अनुभव पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना देऊन, त्याच्यातुन नगरसेवक कसे घडवता येतील यावर केंद्रित झाले आहेत. त्यासाठीच ते पुण्यातील सामान्य कार्यकर्त्यांसाठी “होय, मी नगरसेवक होणारच” मिशन २०२२ राबवून पक्षासाठी जमिनीवरील प्रामाणिक योगदान देताना दिसत आहेत. राजकारणात सच्चा पदाधिकारी तोच जो सामान्य कार्यकर्त्यांना देखील आपल्यासोबत मोठं करण्यासाठी झटतो, ना की ते नेते जे केवळ पक्ष नेतृत्वाच्या जवळ घोंगावत जागतिक ज्ञान वाटून, स्व-पक्षातील मूळ जडणघडणीकडे दुर्लक्ष करून, कॉमेडीयनला पक्ष नैतृत्व कसे मुलाखती देतील यासाठी पुढाकार घेऊन समाज माध्यमांवर धावाधाव करताना दिसत आहेत, ज्याचा पक्षवाढीला आणि बळकटीला काहीच फायदा होणार नाही.

“होय, मी नगरसेवक होणारच” मिशन २०२२ शिबिराला १६५ कार्यकर्त्यांनी नावे नोंदवली मात्र सभागृहात केवळ १३० जागा होत्या. राज्यातील आज मोजके नगरसेवक असतील ज्यामध्ये मनसेचे वसंत मोरे यांचं नाव घ्यावं लागेल. पुण्यात त्यांनी उभारलेल्या सुसज्ज अभ्यासिकेचं उद्घाटन स्वतः मनसे राज ठाकरे यांनी केलं होतं. ऐकवून २०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या अभ्यासिकेची व्यवस्था कॉर्पोरेट स्तरावरील आणि वास्तूसमोरील मोकळ्या प्रांगणात उद्यान देऊन ताणतणावात मोकळेपणा देण्याचा विचार एखादा नगरसेवकाच्या विचारातून येत असेल तर त्याचं अनुकरण आमदार-खासदारांनी देखील करणं गरजेचं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#RajThackeray(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x