12 August 2020 3:28 PM
अँप डाउनलोड

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर: चंद्रकांत पाटील

BJP Leader Chandrakant Patil, Chief Minister Uddhav Thackeray Oath Ceremony

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु आता या शपथविधी सोहळ्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. तसंच याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तसेच बाळासाहेबांना आम्ही हिंदुह्दयसम्राट म्हणतो, तुम्ही म्हणाल का? हंगामी अध्यक्ष नियमबाह्य बदलण्यात आला. कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आलं. प्रोटोकॉलनुसार शपथविधी झाला नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या डांबून ठेवून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे. आमदारांना कुटुंबाशी संवाद साधता येत नाही. आमदारांना अद्याप कोंडून का ठेवलं? मारुन मुटकून सरकार चालविता येणार नाही, ते जास्त दिवस टिकणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टी, प्रहार जनशक्तीचे प्रत्येकी दोन आणि शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रत्येकी एक आमदार आणि सात अपक्ष आमदार सरकारच्या पाठिशी आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x