मुंबई, २५ ऑगस्ट | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का? बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का? असा प्रश्न विचारत आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे नितेश राणे कणकवलीत बोलताना म्हणाले.

आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – BJP MLA Nitesh Rane criticized CM Uddhav Thackeray :

राज्याच्या प्रमुखाला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे माहिती नाही:
राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी देशाचा अपमान केला आहे. त्यांना हे माहिती नाही की देशाचा अमृत महोत्सव आहे. त्यांना हे अधिकाऱ्यांना विचारावं लागतं. मुख्यमंत्री पदावर असलेल्या पदावरून विचारावं लागत हा आपल्या देशाचा अपमान नाही का? याबद्दल देशाचा नागरिक म्हणून आपल्याला चीड येत नाही का? असे नितेश राणे म्हणाले. प्रत्येक जण राणे यांच्यासारखं प्रसार माध्यमांसमोर बोलू शकत नाही. भावना व्यक्त करू शकत नाही. मात्र असंख्य देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या. राज्याच्या प्रमुखाला देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे माहिती नाही. मग मुख्यमंत्र्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का होऊ शकत नाही? या घटनेबाबत नागरिक म्हणून संतप्त भावना व्यक्त झाल्या तर त्यात वावगे काय आहे असेही नितेश राणे म्हणाले.

हे सरकार देशविरोधी आहे:
हे सरकार हिंदूविरोधी सरकार आहेच पण देशविरोधी सरकार आहे असेही नितेश राणे म्हणाले. देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का? असा सवाल आम.नितेश राणे यांनी केला. ‘देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केला आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी’ अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Nitesh Rane criticized CM Uddhav Thackeray news updates.

आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नितेश राणे