30 April 2025 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

आमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे

MP Raosaheb Danve, MP Supriya Sule

मुंबई : भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.

२०१४मध्ये सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस-एनसीपीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यांच्यावर आरोप केले होते. त्याच नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतले जात आहे. हे डागाळलेले नेते आता सत्ताधाऱ्यांना कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन धुतले जाते, असा सवाल एनसीपीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुळे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत उत्तर दिले होते.

भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस, एनसीपीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत होते. लोकसभेआधी तर भारतीय जनता पक्षामध्ये मेगा भरती होती. परंतु, या भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना खुद्द आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष प्रवेश देत उमेदवारीचीही माळ गळ्यात घालत असल्याने भाजपवर टीका होत होती. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस, एनसीपीच्या नेत्यांना पक्षात घेताना त्यांच्यावरील आरोपांची, गुन्ह्यांची पडताळणी करूनच घेत असल्याचे सांगितले होते. यावर एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी कोणती पावडर असल्याचे विचारले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे डॅशिंग रसायन असल्याचे उत्तर दिले होते. यावर सुळे यांनी या घातक रसायनापासून सावध रहा असा इशारा पक्षबदलू नेत्यांना दिला होता.

राज्यात युती असल्याने बहुतांश ठिकाणी शिवसेनेच्या वाट्याच्या जागांवर भारतीय जनता पक्षाने भरती चालविली होती. मात्र, या नेत्यांनी भाजपात घेताना त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर नारायण राणेंसारखे अनेक नेते अद्यापही आश्वासन पूर्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनीच भरती थांबविल्याचे जाहीर केले होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या