15 August 2022 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून फडणवीस व महाजनांनी माझ्या विरोधात डाव आखला

Eknath Khadse, Devendra Fadnavis, Girish Mahajan

जळगाव: स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच मला विधानसभेचं तिकीट नाकारतानाच माझ्या मुलीचाही पराभव घडवून आणला गेला, असा थेट आणि खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेऊन आरोप केल्याने भारतीय जनता पक्षामध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचं समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करताना खडसेंनी कोअर कमिटीतील चर्चेचा संदर्भ दिला. ‘कोअर कमिटीमध्ये तिकीट वाटपावर चर्चा झाली. त्यामध्ये १७-१८ सदस्य होते. यातील अनेकजण माझ्या ओळखीचे होते. त्यांनी या बैठकीत झालेल्या घटनांची माहिती मला दिली. मला विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात फडणवीस आणि महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुढे काय झालं, याची तुम्हाला कल्पनाच आहे,’ असं खडसेंनी एका टीव्ही वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होत. त्यानंतर, फडणवीस आणि महाजन यांच्यावर मी नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

“नाराजी असू शकते पण ती कशाबद्दल होती हेदेखील सांगायला हवं होतं. अशी कोणती मोठी चूक केली होती,” अशी विचारणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपण शिवसेनेच्या संपर्कात होतो असा खुलासाही केला. “मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेते माझ्या संपर्कात होते हे खरं आहे. परंतु चौकशी सुरु झाली असल्याने कारवाई काय होत आहे याची वाट पाहत आहे,” असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

 

Web Title:  BJP Senior Leader Eknath Khadse made serious allegations over former CM Devendra Fadanvis and Minister Girish Mahajan.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x