15 December 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

गोपीनाथजींनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही: एकनाथ खडसे

Chief Minister Devendra Fadanvis, Leader Eknath Khadse, Former CM Devendra Fadnavis

परळी: गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भारतीय जनता पक्ष नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. गोपीनाथ गडावर दिवंगत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष जसा वाढविला. अनेक संघर्ष केला पण जी अवस्था त्यांची होती आज माझी अवस्था आहे. आज माझ्यामागे कोणी नाही, कोण आहे माझ्यामागे? गोपीनाथ मुंडे माझ्या पाठिशी नाही त्याची खंत आहे. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ असं बोललं जात होतं. आज दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे नाहीत. सध्यातरी भारतीय जनता पक्षात मी आहे पक्षाचा आदेश आहे पक्षाविरोधी बोलू नका, पक्षाविरोधात मी बोललो नाही, पक्ष मला प्रिय आहे, पण जे चित्र पक्षाचं महाराष्ट्रात आहे ते लोकांना पसंत नाही, पंकजा मुंडे या सहन करताय त्यांना बोलता येत नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ अन् त्यांची मुलगी पराभूत झाली. हे घडलं नाही तर घडवलंय हे सर्वांचे म्हणणं आहे असं त्यांनी सांगितले.

“शेठजी-भटजींचा पक्ष असं म्हणून भारतीय जनता पक्षाला हिणवलं जात असे. मात्र या पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली ती गोपीनाथ मुंडे यांनी. गोपीनाथ मुंडे यांच्या आणि पंकजाताई यांच्या प्रेमापोटी इथे लोक आले आहेत. मुंडे यांच्या काळातला भारतीय जनता पक्ष हा पक्ष आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची साथ कधीही सोडणार नाही” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title:  BJP Senior Leader Eknath Khadse Slams Former Chief Minister Devendra Fadanvis In His Speech

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x