2 May 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

संतापजनक! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं लावारीस: भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ

BJP, Awadhut Wagh, farmers Suicide

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजून एक संतापजनक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख ‘लावारीस’ म्हणून केला आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.

भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ ट्विटरवर ‘चौकीदार अवधूत वाघ’ या अकाऊंटवरुन सक्रीय आहेत. याच अकाऊंटवरुन त्यांनी एक ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची चेष्टा केली. मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी पातळी सोडली. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…’, असं संतापजनक उत्तर वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या