23 September 2021 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

बीडमध्ये जनआशीर्वाद यात्रा वादात | अंगार-भंगार घोषणा काय देताय? | पंकजा समर्थकांवरच संतापल्या

Pankaja Munde

परळी, १६ ऑगस्ट | भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली. “भव्य जनआशिर्वाद यात्रा दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021, मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केले.भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा 19,567 किमीहून अधिक लांबीची असणार असून ती 19 राज्यातून जाणार आहे. या दरम्यान 1663 लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

भागवत कराड यांच्यासमोर राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा संतापल्या. अंगार भंगार घोषणा काय देताय…. तुमच्यावर असे संस्कार आहे का? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?… असं वागणं मला चालणार नाही… असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका… जेवढ्या उंचीच आहे मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर येऊ नका परत माझ्याकडे, असं म्हणत पंकजा संपातून गाडीच्या दिशेने निघून गेल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Beed Parli BJP Jan Ashirwad Yantra in controversy news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x