23 October 2019 11:19 AM
अँप डाउनलोड

अमरावती शिवसेनेतील वाद विकोपाला; मातोश्रीवर बैठका

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Anandrao Adsul, Abhijit Adsul, Anant Gudhe, Shivsena, Amaravati loksabha

अमरावती : माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. गुढे यांची पक्षातून हकालपट्टी करा असे आवाहन अडसूळ यांनी पक्षप्रमुखांना केले. या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे.अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे. गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केल्याचा आरोप करत गुढे यांना मातोश्रीवर थारा नको, गुढे गद्दार आहेत असा आक्षेप माजी आमदार आणि कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी केलाय. अभिजीत हे नवनित राणा यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत. अनंत गुढे हे आनंदराव अडसुळांचा प्रचार करताना कधी दिसले नाहीत. त्यामुळे अशा गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

आजकाल मातोश्रीवर गद्दारांना माफ केलं जात. त्यामुळे आमच्यासारखे अंगावर केस घेतलेल्यांकडे दुर्लक्ष होत. या गद्दारांना पक्षातून बाहेर फेकले जावे असे ते म्हणाले. आनंदराव अडसूळ कसे नालायक आहेत, कसे वाईट आहेत हेच अनंत गुढे यांनी पेरले. गेल्या पाच वर्षात गुढेंनी आनंदरावांबद्दल विषाची पेरणी केली असेही अभिजीत अडसूळ म्हणाले.

अमरावतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ यांचा पराभव झाला होता आता या पराभवाचे साईड इफेक्ट दिसू लागले आहे. माजी खासदार अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे. अडसूळ यांच्या पराभवानंतर मंथन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमरावतीचा वाद मिटणार की वाढणार हे लवकरच समोर येईल. दरम्यान, अडसूळ गट अत्यंत आक्रमक झाला असून पराभवाचे खापर गुढे यांच्यावर फोडू लागला आहे. गुढे यांच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडिओ आणि फोटो उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(635)#udhav Thakarey(392)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या