इयत्ता १ ली ते १२ वीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी घटवला, राज्य सरकारची मंजुरी

मुंबई, २५ जुलै : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली. ‘कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत,’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. @scertmaha @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks pic.twitter.com/XjSdQZKHAQ
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 25, 2020
दुसरीकडे, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दररोजची सगळीच कामे आता बदलून गेली आहेत. प्रत्येकाल आता जास्त काळजी घ्यावी लगात आहे. सगळ्यांना चिंता आहे ती विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाची. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनावर उपाय असल्याने शाळेत पूर्वीसारखं आता जाता येणार नाही. ही परिस्थिती किती दिवस असेल याचाही अंदाज अजुन कुणालाच नाही त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. कोरोनामुळे बाहेर खेळण्यावर मुलांना बंधणं आली आहेत. त्यात सगळाच अभ्यास ऑनलाईन असल्याने मुलं मोबाईल आणि लॅपटॉप समोर बसून राहत आहे. त्यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांना चिंता वाटत होती. त्यामुळे तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने हे नवे नियम जाहीर केले आहेत.
News English Summary: It has been decided to reduce the syllabus from 1st to 12th standard by 25%. Information about this will be made available on the SCERT website. Education Minister Varsha Gaikwad informed that the curriculum was reduced to provide relief to the students during the Corona crisis.
News English Title: Corona Virus 25 per cent syllabus of 1st to 12th standard reduced amid covid 19 crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL