पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं म्हटलेलं पण लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुडवडा होतोय

मुंबई, २२ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी संकटाच्या प्रसंगात महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे म्हटले. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्व आरोग्य सुविधा पुरवाव्यात. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातही केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे राऊत यांनी म्हटले. एक दिवस उद्योगधंदे बंद राहिले तरी चालतील पण लोकांचा जीव वाचला पाहिजे. आता भारतीय जनता पक्षशासित राज्यांमध्ये लॉकडाऊन लावावा, यासाठी हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागत आहे, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पुढे बोलताना राऊत यांनी, पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं सांगितलेलं असतानाही महाराष्ट्रात लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता का निर्माण केली जातेय हा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे. “पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेलही पण मग हे कोण झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत जे फक्त महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खळतायत?”, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
News English Summary: PM Narendra Modi has said that no state will be deprived of oxygen and remedicivir injections. So they have no idea about any state in their mind. But some political Shukracharyas in the BJP are creating obstacles in getting help to Maharashtra, alleged Shiv Sena MP Sanjay Raut.
News English Title: Coronavirus Pandemic Shivsena MP Sanjay Raut slams Modi govt over shortage of corona related machineries news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER