19 August 2019 3:28 AM
अँप डाउनलोड

विधानसभेत 'त्या' १५३ जागांवर मनसेला मोठी सुवर्णसंधी: प्रकाश आंबेडकर

विधानसभेत ‘त्या’ १५३ जागांवर मनसेला मोठी सुवर्णसंधी: प्रकाश आंबेडकर

अकोला : आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.

त्यानुसार शिवसेना १३५ आणि भाजपाचे मित्र पक्ष १५३ जागांवर लढणार आहेत. लोकसभा निवडणुकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना ‘कोमा’त आहे. शिवसेना आणि मनसे यांना मतदान करणाऱ्यांची मानसिकता सारखी असल्यामुळे ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना पुनरागमनाची सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. १५३ विधानसभा मतदारसंघांत मनसेच्या चांगली कामगिरी करू शकते, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा सर्वच विरोधी पक्षाकडून सुरु आहे. त्यात अनेकांनी आपला पराभव नेमका कशामुळे झाला त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर चिंतन केल्यावर प्रकाश अमीबेडकर म्हणाले की, दलित आणि मुस्लिम हे समीकरण जसे औरंगाबादमध्ये जमून आले, तसे इतरत्र जमून आले नाही, इतर ठिकाणी मुस्लिम मते न मिळाल्यानेच वंचित बहुजन आघाडीचा मोठा पराभव झाला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आज अकोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. दलित आणि मुस्लिम यांनी एकगठ्ठा मतदान केल्यामुळे औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. परंतु इतर ठिकाणी असे झाले नाही. मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली नाहीत, म्हणून आघाडी हरली, असे आंबेडकर म्हणाले.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(63)#Raj Thackeary(364)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या