2 May 2025 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

काहीच वाच्यता न करता भाजपने अप्रत्यक्षरीत्या काही सहकारी पक्ष नेत्यांसकट हॅक केले? सविस्तर

Mahadev Jankar, Ramdas Athavale, Sadabhau Khot, Vinayak Mete, Devendra fadnvis

मुंबई : भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.

या पक्षाच्या प्रमुखांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महादेव जाणकार आणि सदाभाऊ खोत हे राज्य मंत्रिमंडळात आहेत, तर रामदास आठवले हे केंद्रात मंत्रीपदी आहेत. त्यात कोणतीही राजकीय शक्ती नसलेले विनायक मेटे यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचं अध्यक्ष पद आणि शासनाच्या खचातून २० लाखाची गाडी बहाल करण्यात आली आहे. वास्तविक या सर्व नेत्यांना त्यांच्या स्वबळाची जाणीव नसणार असा विषय नसून, भाजपाला देखील त्याची कल्पना आहे. केवळ एका अमुक समाजाच्या चेहरा म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे असंच म्हणावं लागेल. यांच्या मंत्रिमंडळातील आणि विकासाच्या कामगिरीवर न बोललेलंच बरं आहे.

भाजपने या चारही पक्षातील प्रमुखांना सत्तेत खुश करून त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वापरलं आहे. त्यात पक्ष वेगळे असले तरी त्यांना निवडणूक देखील भाजपच्या कोट्यातून आणि चिन्हांवर लढवावी लागते. मध्यंतरी या चारही नेत्यांनी एकत्र येऊन भाजपवर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने एका हॉटेलमध्ये बैठक देखील बोलावली, मात्र भाजपने त्याकडे ढुंकूनही पहिले नाही आणि हे नेते पुन्हा शांत झाले. आमचा पक्ष आहे हे दाखवण्यासाठी, दरवर्षी केवळ पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यापलीकडे त्यांच्या हातात सध्या काहीच नाही. अनेक वेळा विधासनसभा निवडणुकीच्या तोंडावर १०-१५ जागांची मागणी केली जाते, मात्र इथे शिवसेनेची डाळ शिजत नाही तिथे पक्षांना कोण विचारणार अशी अवस्था आहे. त्यामुळे पक्ष वेगळे असले तरी त्यांच्या अध्यक्षांना भाजपच्या तालावर नाचण्याशिवाय सध्या तरी दुसरा मार्ग नाही असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, रासपला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी अधिक जागांवर लढण्याबरोबर पक्षाच्या चिन्हावर लढणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढणार नाहीत तर रासपच्या चिन्हावर लढतील, असे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या