11 April 2021 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आयुक्तांमार्फत पैसे गोळा केलेले | मी त्यांना पुराव्यांसहित माहिती दिलेली

Former MLA Anil Gote, Corruption, Devendra Fadnavis

धुळे, २४ मार्च: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. हातातील सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढळत चालले. देवेंद्र फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

केवळ सुशांतसिंग राजपूत, कंगना रनौत, अर्णव गोस्वामी आणि आता वाझे प्रकरण उपस्थित करायचे. प्रसार माध्यमांच्या मागण्यांची पूर्तता करायची आणि महाराष्ट्रातील गारपीट, अवकाळी पाऊस, शेतीमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर, बेरोजगारी, कोरोना या प्रश्नांवर जो अक्रस्ताळेपणा आवश्यक आहे, तो करत नाही. फक्त मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून आपल्या पाच वर्षाच्या कालावधीतील भानगाडी उघड्या होता कामा नये, हा हेतू मनात ठेवून फक्त खोटं बोलत आहेत, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

दरम्यान, माजी आमदार अनिल गोटेंनी यावेळी कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली”, असं गोटे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे. उगाच नाक वर करून आणि लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा सुद्धा विश्वास ठेवत नाही”, असं देखील या पत्रकात पुढे म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत अनिल गोटे?
काल फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता अनिल गोटेंकडून खरमरीत शब्दांमध्ये परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचं समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे”, असं गोटेंनी या पत्रकात म्हटलं आहे.

 

News English Summary: State Opposition Leader Devendra Fadnavis is very arrogant, deceitful and deceitful. Fadnavis’s mental balance has been deteriorating since he lost power. Has there been any corruption complaint against Devendra Fadnavis so far? This question has been asked by Anil Gote, State Vice President of NCP. Anil Gote has leveled various allegations against Devendra Fadnavis.

News English Title: Former MLA Anil Gote made serious allegations of corruption on Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x