15 December 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Sarkari Naukri | टपाल विभागात 1137 जागांसाठी भरती | पगार १२ हजार | १०वी पास

Indian Postal Department recruitment 2021, Grameen Dak Sevak, free job alert

मुंबई, २४ मार्च: भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांवरील रिक्त जागे भरती प्रक्रिया सुरु केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. यासंदर्भात टपाल खात्याने अधिसूचना जारी करून भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी पोस्ट विभागाने 1137 भरती काढली आहे.

पदाचे नाव:
ग्रामीण डाक सेवक

एकूण जागा:
1137

पगार:
10,000 ते 12,000 रुपये + केंद्रीय भत्ते

अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

शैक्षिक पात्रता:
दहावी उत्तीर्ण + संगणकाचे मूलभूत ज्ञान + शासकीय किंवा खासगी संस्थांकडून किमान 60 दिवस संगणक प्रशिक्षण कोर्स असणे बंधनकारक

वयोमर्यादा:
किमान 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे

असा करा अर्ज:
भारतीय टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट appost.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी 8 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2021 आहे. भरतीसंदर्भात सर्व माहिती आणि ऑनलाईन अॅप्लिकेशनची लिंक अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

अर्जाची फी:
सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पुरुष उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

 

News English Summary: There are bumper job opportunities for you in the Indian Postal Department. Recruitment process is being started for 10th pass candidates in Indian Postal Department. The Postal Department has started the recruitment process for the vacant posts of Gramin Dak Sevak. What is special is that no test will be taken for this. In this regard, the postal department has issued a notification regarding recruitment. The post department has recruited 1137 people for the post of Grameen Dak Sevak.

News English Title: Indian Postal Department recruitment 2021 for 1137 Grameen Dak Sevak post free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x