2 May 2025 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

हिमाचलच्या टेकडावर जन्मलेल्या नटीने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये

Former MP Raju Shetti, Kangana Ranaut, Farmer issues, Marathi News ABP Maza

कोल्हापूर, २२ सप्टेंबर : कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यानंतर माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी सारवासारव करणारी अभिनेत्री कंगना राणावतवर शेतकरी नेत्यांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कंगना राणावतला अत्यंत शेलक्या शब्दांत फटकारले आहे. कंगना राणावतचा उल्लेख ‘नटवी’ असा करत शेट्टी यांनी तोफ डागली. ‘जिथे शेतीच केली जात नाही अशा डोंगरावर जन्मलेल्या आणि शेतीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या कंगनासारख्या नटवीने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे यासारखा दुसरा विनोद नाही’, असे सांगतानाच शेतकऱ्यांवर टीका करणारे नट आणि नट्यांना शेतकऱ्यांची मुले सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच शेट्टी यांनी दिला आहे.

“शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचल प्रदेश सारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडे म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सूचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांचे पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील. हा दिवस फार लांब नाही,” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

 

News English Summary: Former MP Raju Shetty, head of Swabhimani Shetkari Sanghatana, has slammed Kangana Ranaut. Referring to Kangana Ranaut as ‘Natvi’, Shetty fired her on statement against farmers. ‘There is no other joke like calling a farmer a terrorist like Kangana, who was born on a hill where no farming is done and has nothing to do with agriculture.

News English Title: Former MP Raju Shetti criticize Kangana Ranaut and Modi government on farmer issue Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या