27 April 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजप सौदेबाजी करत नाही | काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे - फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई, २३ सप्टेंबर | काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही, असं खणखणीत उत्तर फडणवीस यांनी दिलंय.

भाजप सौदेबाजी करत नाही, काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे – Devendra Fadnavis clarification on meet with congress leaders over Rajya Sabha by poll :

भाजप सौदेबाजी करत नाही:
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी भेट घेतली. त्यांनी विनंती केली की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यावर मी त्यांना सांगितलं की आमची कोअर कमिटी, आमचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा नाही. भारतीय जनता पक्ष सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे.

भाजपचे निलंबित आमदार:
भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचं निलंबन हे नियमबाह्य आहे. आम्ही त्याबाबत कोर्टात गेलो आहोत. आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढू. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Devendra Fadnavis clarification on meet with congress leaders over Rajya Sabha by poll.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x