1 May 2025 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, तो ठेवला जातं नाही, पण राज्यपाल त्यासाठी समर्थ आहेत - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे, ०४ ऑगस्ट | राज्यपाल तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन हॉस्टेलचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. तर तिथेच राज्यपाल आपल्या दौऱ्यावर ठाम असल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद काही थांबतात दिसत नाही. उलटपक्षी या वादात रोज नवीन अंक जोडला जाऊन, हा वाद विकोपाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या वादाच्या अंकात नवी भर पडली आहे. राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावर राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5, 6 आणि 7 ऑगस्ट असे तीन दिवसाचा मराठवाडा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने मुलांचे आणि मुलींचे असे दोन हॉस्टेल बांधले आहेत. या हॉस्टेलचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते विद्यापीठाकडे वर्ग केलेले नाहीत. त्याचे उद्घाटन करुन नंतर विद्यापीठाकडे देणे हा अधिकार राज्य सरकारचा आहे. राज्यपालांना बोलवायचा हा व्यवस्थापनाचा त्यांचा अधिकार आहे. पण सरकारने केलेली कामे अल्पसंख्याक विभागाला न विचारता, सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही, असा आक्षेप अप्लसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला आहे.

या पार्श्वभीमीवर आज पुण्यात आजोयति पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची बाजू घेत, राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले. राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, राज्यपालांचं जे स्थान आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातय. राज्यपाल त्यासाठी समर्थ आहे, राज्यघटना त्यासाठी समर्थ आहे. पण आम्ही या विषयाबद्दल जे चाललं आहे त्याबद्दल नापसंती व्यक्त करतो.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Governor should be respected said BJP State president Chandrakant Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या