40 आमदार, 12 खासदार असूनही ग्रामपंचायत निवडणुकीतील शिंदे गटाच्या अपयशावर दिल्ली भाजपाची चर्चा, शिंदेंना दिल्लीत बोलावलं

CM Eknath Shinde | ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला सरशी झाल्याचं पहायला मिळतंय. 594 ग्रामपंचायतींपैकी 258 ग्रामपंचायतींवर मविआने विजय मिळवलाय. तर भाजप-शिंदे गटाने 228 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावलाय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर पहायला मिळली. भाजपने 188 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादीने 136 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला.
विशेष म्हणजे शिवसेना पक्ष फुटीनंतरही ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 37 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला असून, 40 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत शिंदे गट चौथ्या स्थानावर आहे. म्हणजे ४० आमदार आणि १२ खासदार फोडूनही शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या एकूण जागांमध्ये फक्त ३ जागांचा फरक असल्याने दिल्लीतील भाजपच्या श्रेष्टींनीं चिंता व्यक्त केली असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला बोलाविण्यात आले आहे. भाजपच्या टीमने ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विश्लेषण केले असून शिंदे गटाने चिंता वाढवली आहे असं म्हटलं जातंय. कारण त्यामुळे भाजपचं लोकसभा मिशन ४५ धुळीला मिळविण्याचे संकेत भाजप श्रेष्टींना मिळले आहेत. तसेच शिंदे आणि शिंदे गटाच्या सर्व बाजू भाजप श्रेष्टींनीं विचारात घेतल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुक आणि शिंदे गटाचं वास्तव :
राज्यात कालच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्यात महाविकास आघाडी समर्थक पॅनलची आकडेवारी मोठी ठरल्याने राज्यातील वातावरण हे भाजपसाठी पोषक नाही असं दिल्लीतील भाजप वरिष्ठांनी निष्कर्ष काढला आहे. त्यात मोदी-शहांची सर्वात मोठी चिंता म्हणजे शिंदे गटात तब्बल ४० आमदार (अपक्ष सोडून) आणि १२ खासदार असून त्यात ग्रामीण भागातील आमदार-खासदारांची संख्या खूप मोठी आहेत.
दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे १५-१६ आमदार असून त्यातील १० पेक्षा अधिक आमदार हे मुंबई-कोकण पट्ट्यातील आहेत, जेथे ग्रामपंचायत निवडणुकाच नव्हत्या. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटातील इतर आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात या ग्रामपंचायत निवडणुका नव्हत्या. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदारांच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. असं असतानाही शिंदे गटाला केवळ ४१ जागा आणि शिवसेनेला ३७ जागा मिळाल्याने दिल्लीतील भाजपने आश्चर्य व्यक्त केले आहे. म्हणजे सोबत असलेले ४० आमदार आणि १२ खासदार यांची बेरीज केली तरी ५२ होते, पण ग्रामपंचायतीत केवळ ४० जागा मिळाल्याने भाजपने भीती व्यक्त केली आहे. त्यातही राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वापर नसल्याने शिंदेचा मतदार किती समजणं कठीण असून, शिवसेनेचा पारंपरिक मतदार कुठेच जाणार नाही असा अंदाज दिल्लीतील भाजपने दोन्ही बाजूच्या खासदार-आमदारांच्या संख्येवरून व्यक्त केला आहे. त्यात उद्या न्यायालयीन लढाईत धनुष्यबाण चिन्हं सुद्धा निसटलं तर शिंदे गटातील अनेकांचं राजकीय आयुष्य संपुष्टात येईल असं म्हटलं जातंय. त्यामुळे या आमदारांना राजकीय तंबी सुद्धा दिली जाऊ शकते असं वृत्त आहे.
भाजपाच्या रणनीतीकारांनी अनेक बाबी तपासून पहिल्या :
काँग्रेसकडे १ खासदार 44 आमदार :
काँग्रेस संपली संपली अशी बोंब करणाऱ्या भाजपाची हवाच निघाली आहे. विभागनिहाय काँग्रेसकडे फक्त 1 खासदार 44 आमदार असताना सुद्धा काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून त्यांना ६० जागा मिळाल्या आहेत. मग शिंदेंनी नेमका कोणता तिर मारला असा प्रश्न भाजपने दिल्लीत उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे ४ खासदार – आमदार 54:
शिंदें गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे ४ खासदार आणि ५४ आमदार असतान सुद्धा राष्ट्रवादीने निकालामध्ये थेट भाजपाला टफ दिली असून, त्यात १२ खासदार आणि ४० आमदार असलेला शिंदे गट आसपासही नाही असं भाजपने म्हटले आहे.
शिंदेची भाषण शैली जनतेच्या पचनी पडली नाही :
शिंदे सभांमधून झंझावात निर्माण करू शकतील असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि शैली नसल्याने दिल्लीतील भाजपाला त्यांचा प्रचारात फायदा होईल असं वाटत नाही. औरंगाबाद येथील पैठणच्या सभेसाठी भाजपने संपूर्ण रसद पुरवून तिथे केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते, तरी त्याचा काहीच फायदा किंवा प्रभाव पडला नाही असा निष्कर्ष काढला आहे. एकूण शिंदेंची भाषण शैली ही निवडणुकीत काहीच कामाची नाही असं भाजपाला वाटत असून, सध्या त्यांच्याकडे आकर्षित होणारे इतर पक्षातील पदाधिकारी विद्यमान पक्षात अगदी नगरसेवक पदासाठीही उमेदवारी मिळत नसल्याने तिकीट मिळण्याच्या आशेने शिंदे गटात जात असून, त्यांच्यामध्ये निवडून येण्याची किंवा निवडून आणण्याची क्षमताच नसल्याचा भाजपकडे रिपोर्ट गेला आहे. एकूण शिंदे प्रकरण भाजपाला विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत फलदायी ठरणार नाही असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यातही सुप्रीम कोर्टात निकाल विरोधात गेल्यास शिंदे भाजपसाठी पूर्णपणे कुचकामी ठरतील असं भाजपला वाटतंय. शिंदेंना मुख्यमंत्री पद हे काही काळासाठीच देण्यात आल्याचं भाजपचे दिल्लीतील नेते सांगतात. कारण त्या पदाच्या आधारेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि नेते त्यांच्याकडे आकर्षित करता येतील असं भाजपाला वाटत होतं. पण तसं मोठ्या प्रमाणावर काहीच होताना दिसत नाही. अजून उद्धव ठाकरे स्वतः प्रचारासाठी बाहेर पडले नसून सध्या ती जवाबदारी पूर्णपणे आदित्य ठाकरेंवर देण्यात आली आहे. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजपाची डोकेदुखी अजून वाढली आहे. उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर अधिकाधिक पदाधिकारी आणि नेत्यांच्या भेटी घेऊन राज्यातील पक्ष नियुक्त्यांवर केंद्रित आहेत. त्यानंतर ते बाहेर पडल्यावर खरा धुरळा उडेल असं म्हटलं जातंय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra Grampanchayat 2022 result creates tension in BJP after Shinde unsuccess check details 20 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON